राहुरी तालुक्यात दोन विविध घटनेत दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 11:02 IST2020-07-17T11:00:50+5:302020-07-17T11:02:10+5:30

राहुरी तालुक्यातील दोन विविध घटनेत दोघांचा मृत्यू झाला. ताहराबाद येथील संपत बर्डे (वय ३५) या तरूणाचा १५ जुलै रोजी अज्ञात कारणाने मृत्यू झाला. तर दुसºया घटनेत वांबोरी येथील शुभम् ढगे (वय २२) तरुणाचा १४ जुलै रोजी पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Two killed in two separate incidents in Rahuri taluka | राहुरी तालुक्यात दोन विविध घटनेत दोघांचा मृत्यू

राहुरी तालुक्यात दोन विविध घटनेत दोघांचा मृत्यू

राहुरी : तालुक्यातील दोन विविध घटनेत दोघांचा मृत्यू झाला. ताहराबाद येथील संपत बर्डे (वय ३५) या तरूणाचा १५ जुलै रोजी अज्ञात कारणाने मृत्यू झाला. तर दुस-या घटनेत वांबोरी येथील शुभम् ढगे (वय २२) तरुणाचा १४ जुलै रोजी पाण्यात बुडून मृत्यू झाला.

  संपत पोपट बर्डे हा तरूण अज्ञात आजाराने आजारी होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी राहुरी येथील ग्रामीण रूग्णालय येथे दाखल केले होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला तपासून तो मयत झाल्याचे घोषित केले. त्यानुसार राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल हे करीत आहेत.
 
     दुस-या घटना वांबोरी येथे १४ जुलै रोजी घडली आहे. या घटनेत शुभम् अशोक ढगे (वय २२) हा तरूण घरातून ४ वाजेदरम्यान भंगार गोळा करण्याची प्लास्टीक गोणी घेऊन बाहेर गेला. परंतु तो नेहमीप्रमाणे ८ वाजता घरी आला नाही.  तो भंगार गोळा करीत असताना वांबोरी गावाच्या खाणीत पाय घसरुन त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. 

Web Title: Two killed in two separate incidents in Rahuri taluka