अज्ञात वाहनाच्या धडकेने मोटारसायकलवरील दोन जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 14:54 IST2021-01-09T14:53:06+5:302021-01-09T14:54:37+5:30
नगर-दौड रोडवर काष्टी (ता.श्रीगोंदा) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील दोन जण ठार झाले. हा अपघात दि.८ जानेवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास काष्टी जवळ झाला.

अज्ञात वाहनाच्या धडकेने मोटारसायकलवरील दोन जण ठार
काष्टी : नगर-दौड रोडवर काष्टी (ता.श्रीगोंदा) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील दोन जण ठार झाले. हा अपघात दि.८ जानेवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास काष्टी जवळ झाला.
अजय वाळूंज ( वय २२, रा. टाकळी कडेवळीत, ता.श्रीगोंदा जि.अ.नगर) व पवन योगेश खरात (वय १२, रा. काष्टी खरातवाडी, ता.श्रीगोंदा) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.
अजय वाळूंज व पवन खरात हे दोघे श्रीगोंदा येथून कपडे खरेदी करुन काष्टीकडे येत होते. अज्ञात वाहनाने त्यांच्या बुलेट मोटारसायकलला धडक दिली. यात दोघेही ठार झाले. अपघातानंतर धडक देणारे वाहन फरार झाले आहे.