कंटेनर-टेम्पो अपघातात दोन ठार; एक जखमी, चिचोंली फाट्यावरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 16:40 IST2020-08-12T16:40:49+5:302020-08-12T16:40:59+5:30
कंटेनर व टेम्पोची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी (१२ आॅगस्ट) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कर्जत तालुक्यातील चिंचोली फाटा येथे घडला.

कंटेनर-टेम्पो अपघातात दोन ठार; एक जखमी, चिचोंली फाट्यावरील घटना
कर्जत : कंटेनर व टेम्पोची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी (१२ आॅगस्ट) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कर्जत तालुक्यातील चिंचोली फाटा येथे घडला.
टेम्पो कर्जतकडून मिरजगावकडे चालला होता. यामध्ये सिमेंट व मजूर होते. तर कंटेनर श्रीगोंद्याकडून जामखेडकडे चालला होता. चिंचोली फाटा (चौफुला) येथील बुधवारी दुपारी ही दोन्ही वाहने समोरासमोर धडकली. यात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
अपघात होताच स्थानिक मदतीसाठी धाऊन आले. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड हे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. जखमींना कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी अपघाताच्या घटनेचा पंचनामा केला आहे. पोलिसांचे मयतांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.