शेवगावात दोन हॉटेल, जिनिंग मिल सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:19 IST2021-02-15T04:19:28+5:302021-02-15T04:19:28+5:30

शेवगाव : नगरपरिषदेचा कारभार हाती घेताच सक्रिय झालेले प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी कामाची धडाक्यात सुरुवात केली. शहरातील मालमत्ता कर ...

Two hotels in Shevgaon, Jinning Mill Seal | शेवगावात दोन हॉटेल, जिनिंग मिल सील

शेवगावात दोन हॉटेल, जिनिंग मिल सील

शेवगाव : नगरपरिषदेचा कारभार हाती घेताच सक्रिय झालेले प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी कामाची धडाक्यात सुरुवात केली. शहरातील मालमत्ता कर थकबाकी असलेली दोन हॉटेल व एक जिनिंग मिल सील लावण्यात आली.

नगरपरिषदेचे कर अधीक्षक डी. सी. साळवे यांच्या पथकाने मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे. प्रशासक तथा प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नेवासा रस्त्यावरील हॉटेल संकेतकडे ७ लाख ७२ हजार ०६, तर हॉटेल गारवाकडे ५८ हजार ४११, तसेच आनंद जिनिंग मिलकडे ३ लाख ८८ हजार ७८९ रुपये मालमत्ता कर थकीत असल्याने कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांना वारंवार सांगून तसेच नोटीस बजावूनही थकबाकी भरली नसल्याने कारवाई करण्यात आली आहे.

अशोक सुपरे, गोपी छजलाणी, श्रीकृष्ण ढाकणे, दीपक कोल्हे, संजय साखरे, हरिभाऊ शेकडे, केतन मुरदारे या पथकाने कारवाई केली. कर अधीक्षक डी. सी. साळवे यांनी मालमत्ता कर थकबाकीदारांना जप्तीची नोटीस पाठविल्याचे सांगितले. मालमत्ता कर वसुलीसाठी नगरपरिषदने धडक मोहीम हाती घेतल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.

देवदत्त केकाण यांनी शुक्रवारी, शनिवारी सकाळी सातच्या सुमारास पाथर्डीहून शेवगाव शहरात दाखल होत आरोग्य विभागाचे कर्मचारी, बाजारकरू, नागरिकांची भेट घेऊन शहरातील समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या कारवाईचे शहरातील नागरिकांनी स्वागत केले.

Web Title: Two hotels in Shevgaon, Jinning Mill Seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.