पाच लाखांचे दागिने लुटणा-या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 17:31 IST2020-06-19T17:31:16+5:302020-06-19T17:31:52+5:30

कोपरगाव तालुक्यातील ओगदी येथे डहाणू येथील एका कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कमेसह ४ लाख ७७ हजार ५०० रुपयांना लुटले होते. पोलिसांनी या गुन्ह्यातील दोन आरोपींना गुरुवारी रात्री वेगवेगळ्या ठिकाणाहून जेरबंद केले आहे.

Two arrested for looting Rs 5 lakh jewelery | पाच लाखांचे दागिने लुटणा-या दोघांना अटक

पाच लाखांचे दागिने लुटणा-या दोघांना अटक

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील ओगदी येथे डहाणू येथील एका कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कमेसह ४ लाख ७७ हजार ५०० रुपयांना लुटले होते. पोलिसांनी या गुन्ह्यातील दोन आरोपींना गुरुवारी रात्री वेगवेगळ्या ठिकाणाहून जेरबंद केले आहे.

कृतीक तराइत चव्हाण (रा. अनकुटे ता. येवला जि. नाशिक) यास पानसवाडी येथून तर गोरख मुरुख्या भोसले (रा. वडगाव बुकटे ता. गंगापूर जि. औरंगाबाद, हल्ली रा. उंदीरवाडी ता. येवला जि.नाशिक) यास अंदरसूल येथून पोलिसांनी अटक केली आहे. 

शुक्रवारी सकाळी या दोनही आरोपींना कोपरगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. १५ जून रोजी ही घटना घडली होतीे.
 

Web Title: Two arrested for looting Rs 5 lakh jewelery