राजुरीत दोन एकर ऊस आगीत खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 19:29 IST2019-01-09T19:28:49+5:302019-01-09T19:29:45+5:30
तालुक्यातील राजुरी गावातील अलका दत्तात्रय तरकासे यांच्या शेतातील पावणेदोन एकर उस व ठिबक संच आगीत जळून खाक झाला आहे. ही मंगळवारी दुपारी घडली.

राजुरीत दोन एकर ऊस आगीत खाक
राहाता : तालुक्यातील राजुरी गावातील अलका दत्तात्रय तरकासे यांच्या शेतातील पावणेदोन एकर उस व ठिबक संच आगीत जळून खाक झाला आहे. ही मंगळवारी दुपारी घडली.
राजुरी गावातील गट नंबर ४५७ मधील अलका तरकासे यांच्या शेतातील पावणे दोन एकर उसाला मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आग लागली. या संपूर्ण ऊस जळून खाक झाला आहे. आगीत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीत ऊस व ठिबक संच खाक झाला. घटनेचा गावचे कामगार तलाठी यांनी पंचनामा केला आहे. वीज रोहित्राच्या शार्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. घटनेच्या ठिकाणी अग्नीशामक बंबाला येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने आग विझविता आली नाही.