विवाह लावण्यासाठी सव्वा दोन लाखांची उकळली दलाली; एका महिलेला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 13:52 IST2020-03-21T13:51:44+5:302020-03-21T13:52:19+5:30
श्रीरामपूर शहरातील व्यापा-याचा विवाह लावून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिला आरोपीस शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीस २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

विवाह लावण्यासाठी सव्वा दोन लाखांची उकळली दलाली; एका महिलेला अटक
श्रीरामपूर : शहरातील व्यापा-याचा विवाह लावून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिला आरोपीस शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीस २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अश्विनी कांबळे असे आहे. गंगापूर (जि.औरंगाबाद) येथून हवालदार जोसेफ साळवी यांनी तिला ताब्यात घेतले. राहुल रजपूत उर्फ कल्याण फकीरराव राऊत, निता राहुल राऊत (दोघे, रा.पुंडलिकनगर, औरंगाबाद), मेधा संजय कटारिया या आरोपींचा शोध घेतला जात आहे. बेलापूर येथील केशव गोविंद बन येथे विवाह पार पडला. दलालीपोटी दोन लाख २१ हजार रुपये उकळण्यात आले. मात्र विवाह सोहळा पार पडताच दोन दिवसात परत येण्याचे सांगत वधूसह आरोपी निघून गेले. मात्र त्यानंतर परतले नाही.