वडिलांनी दिलेला शब्द मुलांनी पूर्ण करणे हाच खरा धर्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:23 IST2021-08-15T04:23:24+5:302021-08-15T04:23:24+5:30
कोपरगाव : हिंदू धर्मात कोणत्याही दानाला फार महत्त्व आहे. दानातून मनुष्याला आत्मिक समाधान मिळते. त्याबरोबर पुण्यफळदेखील मिळते. त्यामुळे वडिलांनी ...

वडिलांनी दिलेला शब्द मुलांनी पूर्ण करणे हाच खरा धर्म
कोपरगाव : हिंदू धर्मात कोणत्याही दानाला फार महत्त्व आहे. दानातून मनुष्याला आत्मिक समाधान मिळते. त्याबरोबर पुण्यफळदेखील मिळते. त्यामुळे वडिलांनी कबूल केलेले दान अथवा शब्द त्यांच्या पश्चात त्यांची मुले प्रत्यक्षात पूर्ण करीत असतील, तर हाच खरा धर्म व संस्कृती असल्याचे परमपूज्य गोविंदगिरी बाबा सिद्धाश्रमाचे मठाधिपती स्वामी नित्यानंदगिरी महाराज यांनी म्हटले आहे.
कोपरगाव - राहाता तालुक्यातील वारी-शिंगवे येथील सिद्धयोगी गोविंदगिरी बाबा सिद्धाश्रम दत्त मंदिर देवस्थान परिसरात जाळीचे कुंपण बसविण्याच्या कामाला शनिवारी (दि. १४) सुरुवात करण्यात आली. या कामाच्या पूजन प्रसंगी ते बोलत होते. नित्यानंद गिरी म्हणाले, परमपूज्य गोविंदगिरी बाबांचे भक्त असलेले कोपरगाव येथील प्रतिष्ठित उद्योजक कैलास गायकवाड यांनी वारी येथील आश्रमास जाळीचे कुंपण बांधून देण्याचे कबूल केले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचे निधन झाले. मात्र, हा विषय त्यांचे मुले निकेतन व शशांक यांना माहीत होता. त्यांनी आपल्या वडिलांनी दिलेला शब्द कोणत्याही परिस्थित पूर्ण करण्याची भावना माझ्याकडे व्यक्त केली आणि त्यानुसारच प्रत्यक्षात या कामाला सुरुवात झाली आहे. यावेळी रामदास जठार, भगवान मेहरे, राजेंद्र टेके, रवींद्र जठार, बाळासाहेब जठार, उद्धव मेहरे, छबू गागरे, बाळू बरवंट यांच्यासह भक्त उपस्थित होते.