ब्रेक फेल झाल्याने संत्रा घेऊन जाणारा ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 13:43 IST2021-02-02T13:39:43+5:302021-02-02T13:43:18+5:30
नाशिकहून पुण्याला संत्री घेऊन जाणारा ट्रक ब्रेक फेल झाल्याने उलटला. हा अपघात मंगळवारी (दि. २) सकाळी साडे अकराच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर संगमेनर तालुक्यातील आळेखिंड येथे घडला.

ब्रेक फेल झाल्याने संत्रा घेऊन जाणारा ट्रक उलटला
घारगाव : नाशिकहून पुण्याला संत्री घेऊन जाणारा ट्रक ब्रेक फेल झाल्याने उलटला. हा अपघात मंगळवारी (दि. २) सकाळी साडे अकराच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर संगमेनर तालुक्यातील आळेखिंड येथे घडला.
या अपघातात ट्रकसह मालाचे मोठे नुकसान झाले आहे. १६ टन संत्री या ट्रकमधून नेण्यात येत होती. अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रमुख, सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.
संत्रा फळाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात कोणी जखमी झाले किंवा नाही, याचा तपशील मिळू शकला नाही.