सैन्याचे घोडदळातून यांत्रिकीकरणात रूपांतर; नगरमध्ये आर्मर्ड डे साजरा
By चंद्रकांत शेळके | Updated: May 2, 2023 20:00 IST2023-05-02T19:57:42+5:302023-05-02T20:00:06+5:30
त्या स्मरणार्थ आर्मर्ड दिवस साजरा केला जातो.

सैन्याचे घोडदळातून यांत्रिकीकरणात रूपांतर; नगरमध्ये आर्मर्ड डे साजरा
चंद्रकांत शेळके, अहमदनगर : येथील आर्मर्ड कॉर्प्स सेंटर आणि स्कूलमध्ये (एसीसी ॲण्ड एस) ८५ वा आर्मर्ड दिवस साजरा करण्यात आला. १ मे १९३८ रोजी रोजी भारतीय घोडदळ रेजिमेंट्सचे यांत्रिकीकरणात रूपांतर झाले. त्या स्मरणार्थ आर्मर्ड दिवस साजरा केला जातो.
भारतीय आर्मर्ड कॉर्प्स ही शौर्याच्या गाथा आणि घोडदळाच्या काळापासून परंपरांच्या समृद्ध वारशाने परिपूर्ण आहे. ‘द सिंध हाॅर्स’ या पहिल्या रेजिमेंटचे १ मे १९३८ रोजी घोडदळातून रणगाड्यांमध्ये रूपांतर करण्यात आले. विकर्स लाइट टँक आणि शेवरलेट आर्मर्ड कार ही रेजिमेंटची पहिली वाहने ठरली. ही रणगाड्यांच्या शौर्य आणि बलिदानाच्या नव्या युगाची पहाट होती. भारतीय आर्मर्ड कॉर्प्सने युद्धभूमीवर वेळोवेळी आपले वर्चस्व सिद्ध केलेले आहे.
आर्मर्ड कोर सेंटरमध्ये आर्मर्ड दिवस उत्साहात साजरा झाला. यावेळी एसीसी ॲण्ड एसचे कमांडंट मेजर जनरल एआरएस काहलो यांच्यासह इतर वरिष्ठ सेवा अधिकारी आणि निवृत्त अधिकाऱ्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"