कोपरगाव-कोल्हार रस्त्यावरील वाहतूक वळविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:17 IST2020-12-23T04:17:43+5:302020-12-23T04:17:43+5:30
कोल्हार येथील पुलाचे बांधकाम येत्या ४ ते ५ जानेवारी, ८ ते ९ जानेवारी, ११ व १३ जानेवारी असे चार ...

कोपरगाव-कोल्हार रस्त्यावरील वाहतूक वळविणार
कोल्हार येथील पुलाचे बांधकाम येत्या ४ ते ५ जानेवारी, ८ ते ९ जानेवारी, ११ व १३ जानेवारी असे चार टप्प्यांत केले जाणार आहे. या काळात अहमदनगरकडून संगमनेर, येवला, मनमाड, मालेगाव व धुळेकडे जाणारी जड वाहने ही नेवासा फाटा, कायगाव टोके फाटा ते गंगापूरमार्गे जातील. चारचाकी व दुचाकी वाहने ही नगर-राहुरी फॅक्टरी मार्गे जातील. शिर्डीकडून अहमदनगरकडे जाणारी सर्व वाहने कोल्हार, बेलापूर व राहुरी फॅक्टरी मार्गे वळविली जाणार आहेत. यादरम्यान श्रीरामपूर ते बाभळेश्वर तसेच कोल्हार ते बेलापूर ही एकेरी वाहतूक राहणार आहे. याबाबत कुणाला काही हरकती असल्यास २७ डिसेंबरपर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेत प्रत्यक्ष येऊन द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.