मतिमंद तरुणीवर अत्याचार प्रकरण; मुख्य आरोपीस अटक    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 16:46 IST2020-03-15T16:45:40+5:302020-03-15T16:46:06+5:30

  अकोले तालुक्यातील गर्दणी-खानापूर येथील एका मतीमंद तरुणीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याप्रकरणी मुख्य आरोपीस पोलिसांनी रविवारी पहाटे म्हाळादेवी शिवारातून अटक केली. त्याचा एक साथीदार फरार असून पोलीस शोध घेत आहेत.

Torture case against a young woman; The main accused arrested | मतिमंद तरुणीवर अत्याचार प्रकरण; मुख्य आरोपीस अटक    

मतिमंद तरुणीवर अत्याचार प्रकरण; मुख्य आरोपीस अटक    

  अकोले : तालुक्यातील गर्दणी-खानापूर येथील एका मतीमंद तरुणीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याप्रकरणी मुख्य आरोपीस पोलिसांनी रविवारी पहाटे म्हाळादेवी शिवारातून अटक केली. त्याचा एक साथीदार फरार असून पोलीस शोध घेत आहेत.
७ मार्चला या तरुणीवर अत्याचार करुन खून झाल्याची घटना घडली. प्रथम आकस्मात, नंतर खून व अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. आमदार डॉ.किरण लहामटे, राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व आदिवासी संघटनांनी आवाज उठविल्यावर गुन्हे अन्वेषणच्या पथकाने १० मार्च रोजी पिडीत तरुणीच्या घराजवळ राहणा-या एका आरोपीस ताब्यात घेतले होते. त्याला पोलीस कोठडीही देण्यात आली. १४ मार्चला खासदार सदाशिव लोखंडे यांनी खानापूरला भेट दिली. तेव्हा ग्रामस्थांनी अटक केलेल्या आरोपीविषयी शंका व्यक्त केली होती. १५ मार्चच्या पहाटे पोलिसांनी सराईत गुन्हेगार सोमनाथ बाळासाहेब गायकवाड (वय ३०, रा.टाकळी) यास अटक करुन हाच मुख्य आरोपी असल्याचा दावा केला आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी रोशन पंडित यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे या प्रकरणाची माहिती दिली आहे.
बोकड चोरण्याच्या इराद्याने गेलेल्या गायकवाड याची नियत फिरली आणि शेळ्या चारणा-या तरुणीवर त्याने बलात्कार करून तिचा खून केला. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला अजून एक साथीदार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. 

Web Title: Torture case against a young woman; The main accused arrested