बर्निंग कारचा थरार, चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 11:43 IST2021-01-08T11:43:08+5:302021-01-08T11:43:56+5:30

श्रीरामपूर- नेवासा राज्यमार्ग क्रमांक ४४ वर पाचेगाव फाटा येथे द बर्निंग कारचा थरार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडला. या घटनेत लाखो रूपये किंमतीची बीएमडब्ल्यू कार पूर्णतः जळून खाक झाली आहे. कार चालक पवन सदाशिवे किरकोळरित्या भाजले आहेत.

The thrill of a burning car, the burning of millions of BMWs | बर्निंग कारचा थरार, चालक जखमी

बर्निंग कारचा थरार, चालक जखमी

 पाचेगाव : श्रीरामपूर- नेवासा राज्यमार्ग क्रमांक ४४ वर पाचेगाव फाटा येथे द बर्निंग कारचा थरार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडला. या घटनेत लाखो रूपये किंमतीची बीएमडब्ल्यू कार पूर्णतः जळून खाक झाली आहे. कार चालक पवन सदाशिवे किरकोळरित्या भाजले आहेत.

    पवन प्रकाश सदाशिवे (रा.अरिहंत जवाहर कॉलनी, औरंगाबाद) हे आपल्या परिवारासह एम.एच.-१४, बी.एक्स. ८७३१ क्रमांकाच्या बीएमडब्ल्यू कारमधून शिर्डी येथून नेवासा मार्गे औरंगाबादला घरी परतत होते. शुक्रवारी पहाटे नेवासा तालुक्यातील पाचेगाव फाटा येथे आल्यानंतर या कारने अचानक पेट घेतला.

    पवन सदाशिवे  हे स्वतः गाडी चालवीत होते. या घटनेत चालक पवन सदाशिवे हे किरकोळरित्या भाजले असून पुढील उपचारासाठी त्यांना नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कार घटनेत अन्य कुणालाही इजा झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली असून लाखोंची कार मात्र पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

Web Title: The thrill of a burning car, the burning of millions of BMWs