सात दुचाकींसह तिघा चाेरट्यांना अटक
By अण्णा नवथर | Updated: November 19, 2023 14:27 IST2023-11-19T14:27:36+5:302023-11-19T14:27:53+5:30
महागड्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

सात दुचाकींसह तिघा चाेरट्यांना अटक
अण्णा नवथर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: शहरासह उपनगरांत दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे. तोफखाना पोलिसांनी सात मोटारसायकलींसह तिघा सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून महागड्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
किरण मनोज पवार ( वय २२ वर्षे, रा. कॉटेज कॉर्नर, नगर ), उमेश दिलीप गायकवाड ( वय १९ वर्षे, रा. नाना चौक ढवणवस्ती, नगर ), मनोज गोरख मांजरे ( वय २२ वर्षे, रा. कल्याण रोड, शिवाजीनगर, नगर ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी शहरासह उपनगरातून ठिकठिकाणाहून चोरलेल्या दुचाकी काढून दिल्या असून, सुमारे ६ लाख १५ हजार रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सदर आरोपींकडून आणखी काही दुचाकी हस्तगत होण्याची शक्यता आहे. ही कारवाई तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक मधूकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखालल पथकाने केली.