वृद्धेश्वर कारखान्याच्या तीन जागा बिनविरोध; ७३ उमेदवारी अर्ज वैध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 17:50 IST2021-01-15T17:50:13+5:302021-01-15T17:50:44+5:30

पाथर्डी तालुक्याची कामधेनू असलेल्या वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या तीन जागा बिनविरोध झाल्या असून, छाननी प्रक्रियेत ७३ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.

Three seats of Vriddheshwar factory unopposed; 73 candidature applications valid | वृद्धेश्वर कारखान्याच्या तीन जागा बिनविरोध; ७३ उमेदवारी अर्ज वैध 

वृद्धेश्वर कारखान्याच्या तीन जागा बिनविरोध; ७३ उमेदवारी अर्ज वैध 

तिसगाव : पाथर्डी तालुक्याची कामधेनू असलेल्या वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या तीन जागा बिनविरोध झाल्या असून, छाननी प्रक्रियेत ७३ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.

१९ जागांसाठी तब्बल १२० उमेदवारी अर्ज दाखल केले होते. गुरुवारी या सर्व दाखल अर्जांची प्रांताधिकारी कार्यालयात छाननी झाली. छाननीत ७३ अर्ज वैध ठरले. पाथर्डी गटातील दोन जागांसाठी विद्यमान संचालक मंडळातील रामकिसन काकडे व सुभाषराव बुधवंत यांचा एकमेव अर्ज राहिल्याने या दोन्ही जागा बिनविरोध झाल्या आहेत.

   कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद सहकारी संस्था मतदारसंघातून एका जागेसाठी कारखाना अध्यक्ष आप्पासाहेब राजळे, आमदार मोनिका राजळे व जिल्हा परिषद राहुल राजळे या तिघांचेच एकूण दहा अर्ज राहिले आहेत. ही जागा बिनविरोध होण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे.

 

Web Title: Three seats of Vriddheshwar factory unopposed; 73 candidature applications valid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.