शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

"महिला बसल्या आहेत, लघवी करु नका"; तरुणाच्या विनंतीनंतर तिघांनी झाडल्या गोळ्या, जामखेडमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 11:05 IST

जामखेडमध्ये रविवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावारण निर्माण झालं आहे.

अशोक निमोणकर 

जामखेड :  जामखेड येथील विंचरणा नदीच्या नवीन पुलावर रविवारी रात्री दहाच्या सुमारास तीन अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली. तिघेजण लघुशंका करत असताना येथे लघवी करू नका महिला आहेत असे म्हटल्याचा राग आल्याने त्यांंनी तरुणास शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने  तरुण व त्याच्यासोबत असलेल्यांवर गोळीबार केला. यामध्ये एकाच्या पायाला गोळी लागली असून त्याला अहिल्यानगर येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.  प्रशांत खैरे, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन तीन पथके आरोपींच्या शोधासाठी पाठवले आहे. 

याबाबत जामखेड पोलीसात आदित्य बबन पोकळे (वय २०, वर्षे धंदा, वॉशिंग सेंटर रा. पोकळेवस्ती, जामखेड) याने फिर्याद दिली. रविवारी रात्री दहा वाजता विंचरणा नदीजवळ  पोकळे वस्तीवरील नागरिक व महिला बसल्या होत्या. यावेळी एका चारचाकी वाहनातून तीन अज्ञात इसम उतरले आणि तिथे लघवी करू लागले. त्यांना आदित्य पोकळे याने येथे लघवी करू नका महिला बसल्या आहेत असे सांगितले. त्याचा राग आल्याने त्यांनी आदित्यला शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी तिथे कुणाल बंडु पवार (वय २० रा. जामखेड) आला. यावेळी तीन अज्ञातांनी त्यांच्याजवळील पिस्टलने या दोघांवर गोळीबार केला.

कुणाल पवार याच्या पिंढरीतून गोळी आरपार गेली. त्यामुळे त्याला जामखेड येथील खाजगी दवाखान्यात उपचार करून अहिल्यानगर येथील दवाखान्यात पुढील उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. 

गोळीबार झाल्याचे समजताच  पोलीस तात्काळ घटनास्थळी गेले परंतु तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक उगले व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट दिली. सदर गुन्ह्यात वापरलेल्या कारच्या नंबरवरून पोलीसांनी शोध सुरु केला असून आरोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली आहे.

रोहित पवार यांची टीका

या घटनेनंतर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एक्स पोस्टवर कारवाईची मागणी केली आहे. "मतदारसंघातील आणि एकूणच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत मी कायम आवाज उठवत आहे. गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही. जामखेडमध्ये रात्री सव्वा दहाच्या सुमारास एका हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाला असून यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी अहिल्यानगरला हलवण्यात आलं. अशा घटनेमुळे शहराच्या शांततेला गालबोट लागत असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन दहशतीत रहावं लागत आहे. सामान्य माणसाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी सरकारने या गुंडगिरीला चिरडून टाकावं, ही विनंती," असं रोहित पवार यांनी म्हटलं.

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJamkhedजामखेड