ट्रक-मोटारसायकल अपघातात तीन ठार; एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 11:58 IST2020-12-09T11:57:20+5:302020-12-09T11:58:14+5:30
ट्रक व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात लोणीव्यंकनाथ येथील तीन तरुण जागीच ठार झाले. तर एक जण जखमी झाला आहे. नगर-दौड रोडवर पवारवाडीजवळ बुधवारी (दि.९) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

ट्रक-मोटारसायकल अपघातात तीन ठार; एक जखमी
श्रीगोंदा : ट्रक व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात लोणीव्यंकनाथ येथील तीन तरुण जागीच ठार झाले. तर एक जण जखमी झाला आहे. नगर-दौड रोडवर पवारवाडीजवळ बुधवारी (दि.९) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
समजलेली अधिक माहिती अशी की, राज विठ्ठल पवार, विशाल संतोष सोनवणे, बाजीराव बरकडे व प्रतिक नरसिंग शिंदे हे चौघे जण मोटारसायकलवरून लोणीव्यंकनाथ गावाकडे जात होते. पवारवाडीनजीक उसाच्या ट्रॅक्टरला ओव्हर टेक करत असताना नगरकडून साताऱ्या कडे जाणाऱ्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. यात राज विठ्ठल पवार, विशाल संतोष सोनवणे, बाजीराव बरकडे हे जागीच ठार झाले. तर प्रतिक नरसिंग शिंदे हा गंभीर जखमी झाला आहे.
ग्रामस्थांनी ट्रक चालकाला पकडून पोलीस उपनिरीक्षक अमित माळी यांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी पोलिसांची टिम घटनास्थळाकडे रवाना केली आहे.