गर्भाशयामधील तीन किलोच्या गाठी काढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:28 IST2021-02-05T06:28:36+5:302021-02-05T06:28:36+5:30

कोपरगाव : मध्य प्रदेश राज्यातील सतना येथील बावीस वर्षीय युवतीच्या गर्भाशयामध्ये ३ किलो वजनाचे दोन फायब्रॉईड ( गर्भाशयातील गाठी ...

Three kg lumps were removed from the uterus | गर्भाशयामधील तीन किलोच्या गाठी काढल्या

गर्भाशयामधील तीन किलोच्या गाठी काढल्या

कोपरगाव : मध्य प्रदेश राज्यातील सतना येथील बावीस वर्षीय युवतीच्या गर्भाशयामध्ये ३ किलो वजनाचे दोन फायब्रॉईड ( गर्भाशयातील गाठी ) होते. अल्पवयामध्ये अशा गाठी होणे हा एक दुर्मिळ आजार आहे. रुग्णाच्या भावी आयुष्याचा विचार करता, गर्भाशयाचे नुकसान न करता या गाठी काढणे ही एक जटील व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती. मात्र, राहाता येथील डॉ. नितीन घोरपडे यांनी आपल्या इन्सपिरीया लेप्रोस्कोपी व आयव्हीएफ रिसर्च सेंटरमध्ये लेप्रोस्कोपी (दुर्बिणीद्वारे ) शस्त्रक्रिया करून सुमारे ३ किलो वजनाचे दोन गोळे काढले आहेत. शक्यतो अशा प्रकारचे ऑपेरेशन ओपन सर्जरीद्वारे केले जाते. ज्यामध्ये रुग्णाच्या पोटावर मोठे व्रण पडतात, रुग्ण बरा व्हायला बराच कालावधी जातो आणि रुग्णाचे भावी आयुष्य सामान्य जाईल की नाही याची खात्री देता येत नाही. परंतु,डॉ. घोरपडे यांच्या उत्क्रुष्ट शस्त्रक्रिया कौशल्यामुळे व येथे उपलब्ध असलेल्या थ्री डी कॅमेऱ्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हि शस्त्रक्रिया कमीत कमी छेद घेऊन दुर्बिणीद्वारे यशस्वीरीत्या पार पडली. अतिशय जटिल व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे यशस्वी केल्याबद्दल डॉ. नितीन घोरपडे यांचे मेडिकल क्षेत्रातील तज्ज्ञांनी कौतुक केले आहे. संपूर्ण भारतातून व परदेशातून स्त्री रोग संदर्भातील सर्व जटिल व गंभीर शस्त्रक्रियांसाठी रुग्ण राहाता परिसरातील डॉ. घोरपडे यांच्या इन्सपिरीया लेप्रोस्कोपी व आयव्हीएफ रिसर्च सेंटरमध्ये येतात, असे पत्रकात म्हटले आहे. (वा. प्र.)

Web Title: Three kg lumps were removed from the uterus