चोरट्यांच्या मारहाणीत तिघेजण जखमी
By Admin | Updated: October 27, 2016 00:48 IST2016-10-27T00:27:52+5:302016-10-27T00:48:29+5:30
अहमदनगर : केडगाव परिसरातील कोतकर मळा येथे चोरट्यांनी तिघांना जबर मारहाण करत दहा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला़ मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली़

चोरट्यांच्या मारहाणीत तिघेजण जखमी
अहमदनगर : केडगाव परिसरातील कोतकर मळा येथे चोरट्यांनी तिघांना जबर मारहाण करत दहा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला़ मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली़ या मारहाणीत तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
केडगाव परिसरातील कोतकर मळा येथे सोमनाथ बाबासाहेब कोतकर, किशोर जगन्नाथ शिंदे व संतोष गणपत पानसरे हे मळ्यात झोपलेले असताना चोरट्यांनी अचानक हल्ला करत त्यांना मारहाण केली़ यावेळी चोरट्यांनी एक मोबाईल व खिशातील पाकीट घेऊन पोबारा केला़
घटनेनंतर सोमनाथ कोतकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चोरट्यांचा शोध घेत बुधवारी दुपारी अरणगाव येथून अशोक ताराचंद रंगेरा व संदिपकुमार मंगलराम कायल (ग्रामउदनजी ता़ फत्तेपूर जि़शिकर राजस्तान) यांना ताब्यात घेतले़ चोरट्यांनी चोरलेला मोबाईल यावेळी ताब्यात घेण्यात आला़ पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप पाटील, कॉस्टेबल तागड, धामणे, इनामदार यांच्या पथकाने ही कारवाई केली़