चोरट्याने दुचाकी लांबवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:37 IST2021-02-05T06:37:17+5:302021-02-05T06:37:17+5:30
------ शिर्डीच्या साई इलेव्हनने पटकावला चषक श्रीरामपूर : माजी आमदार स्व. जयंत ससाणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ...

चोरट्याने दुचाकी लांबवली
------
शिर्डीच्या साई इलेव्हनने पटकावला चषक
श्रीरामपूर : माजी आमदार स्व. जयंत ससाणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय टेनिस बॉल स्पर्धेत शिर्डीच्या साई इलेव्हन संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या स्पर्धेचा अंतिम सामना योगायोगाने नाशिक विरुद्ध शिर्डी यांच्यात झाला. हा सामना पाहण्यासाठी आमदार राधाकृष्ण विखे, खेळाडू केदार जाधव उपस्थित होते. या अखेरच्या सामन्यात शिर्डी इलेव्हन संघाने नाशिक संघाचा पराभव करुन स्पर्धेतील १ लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक आणि नामदार चषक पटकावला. नाशिक येथील शिरसाठ स्पोर्टस् क्लबने ७७ हजार रुपयांचे द्वितीय, टाकळी ढोकेश्वर येथील संघाने ५५ हजार रुपयांचे तृतीय आणि अर्जुन करपे इलेव्हन संघाने ३३ हजार रुपयांचे चौथे बक्षीस मिळविले. शिर्डीच्या दादाभाई शेख हा मॅन ऑफ द मॅच तर नाशिकच्या मुन्ना शेख हा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. बेस्ट बॅटस्मनचे बक्षिसही शिर्डीच्या अमोल दुबे याने पटकाविले.
दीपक पटारे, नानासाहेब पवार,गिरीधर आसने, भिमा बागुल, केतन खोरे, संदीप चव्हाण यांच्यासह क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.