अंडी, कोंबड्या खाण्यापासून कोणताही धोका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:18 IST2021-01-15T04:18:49+5:302021-01-15T04:18:49+5:30

यावेळी डॉ. देविदास शेळके, विनय माचवे, रोहिदास गायकवाड, दत्ता सोनटक्के, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे, पशुसंवर्धन उपायुक्त ...

There is no danger from eating eggs, hens | अंडी, कोंबड्या खाण्यापासून कोणताही धोका नाही

अंडी, कोंबड्या खाण्यापासून कोणताही धोका नाही

यावेळी डॉ. देविदास शेळके, विनय माचवे, रोहिदास गायकवाड, दत्ता सोनटक्के, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बाळकृष्ण शेळके, संतोष कानडे, दीपक गोळक, डॉ. उमाकांत शिंदे, विठ्ठल जाधव, कैलास झरेकर, संदीप काळे, रविंद्र गायकवाड आदींसह पोल्ट्री असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी भोसले म्हणाले की, पाथर्डी तालुक्यात ५२ पक्षी मरण पावले असून, ते बर्ड फ्लूने मेले हे अजून निष्पन्न झाले नाही. यामुळे भिती बाळगण्याचे कारण नाही. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मिडसांगवी गावाला कंट्रोल झोन म्हणून घोषित केला आहे व इतर भाग अलर्ट झोन म्हणून घोषित आहे. पक्षी मृत होत असतील तर त्या भागातील पक्ष्यांची वाहतूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. आतापर्यंत मनुष्याला बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आलेले नाही. जिल्ह्यात अफवा व गैरसमज पसरल्याने पोल्ट्री व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. कोंबडी व अंडी खाल्ल्याने बर्ड फ्लू होतो याला कोणताही शास्त्रीय आधार नसून, यापासून धोका नसल्याचे त्यांनी सांगितले.

कोंबडीचे मांस व अंडी खाणे कोणत्याही प्रकारे धोकादायक नसून, समाजमाध्यांच्या चुकीच्या संदेशामुळे नागरिकांमध्ये गैरसमज पसरला असल्याचे अहमदनगर जिल्हा पोल्ट्री असोसिएशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. बर्ड फ्लू संदर्भात गैरसमज व अफवा पसरवणार्‍यांवर देखील कारवाई करण्याची मागणी यावेळी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.

-------------

फोटो - १४पोल्ट्री निवेदन

बर्ड फ्लूच्या भितीने कुक्कटपालन करणार्‍या व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे गैरसमज पसरण्यावर प्रतिबंध करावा, या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर जिल्हा पोल्ट्री असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: There is no danger from eating eggs, hens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.