शिर्डी पोलीस ठाण्याच्या आवारात तरुणाने संपवलं जीवन

By अण्णा नवथर | Updated: October 2, 2023 12:01 IST2023-10-02T12:01:37+5:302023-10-02T12:01:49+5:30

Ahmednagar News: पोलीस स्टेशनच्या आवारात जमा करण्यात आलेल्या एका जुनाट बसमध्ये आज ऐन गांधी जयंती दिनी सोमवारी (दी.२)  गळफास घेतलेल्या एका तरुणांचा मृतदेह आढळला आहे.

The young man ended his life in the premises of Shirdi police station | शिर्डी पोलीस ठाण्याच्या आवारात तरुणाने संपवलं जीवन

शिर्डी पोलीस ठाण्याच्या आवारात तरुणाने संपवलं जीवन

- अण्णा नवथर
शिर्डी: पोलीस स्टेशनच्या आवारात जमा करण्यात आलेल्या एका जुनाट बसमध्ये आज ऐन गांधी जयंती दिनी सोमवारी (दी.२)  गळफास घेतलेल्या एका तरुणांचा मृतदेह आढळला आहे. तौफिक मुसा इनामदार (वय ३५) असे या तरुणाचे नाव आहे, तो कोळपेवाडी येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

परिवहन विभागाने जप्त केलेली वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आलेली आहेत. यातच पोलीस स्टेशन आवारात संस्थान प्रसादालयाकडे जाणाऱ्या मार्गावर लावण्यात आलेल्या एका भंगार अवस्थेत असलेल्या बस मध्ये ही घटना घडली. पोलिसांनी बसच्या केबिनचा आतील दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढला. पहाटे ही घटना घडली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Web Title: The young man ended his life in the premises of Shirdi police station