शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

शिर्डीच्या साई मंदिरातील सजीव भासणाऱ्या मूर्तीची होत आहे झीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 08:02 IST

भविष्यात आकार बदलून सुंदरता कमी होण्याची शक्यता : मूर्तिकारांकडून चिंता, थ्रीडी स्कॅनिंगद्वारे डाटा संरक्षित करण्याची गरज

प्रमोद आहेरशिर्डी : शिर्डीच्या साई मंदिरातील मूर्तीची दिवसेंदिवस झीज होत आहे. या मूर्तीचा अत्याधुनिक थ्रीडी स्कॅनिंगद्वारे डाटा संरक्षित केला तर पुढच्या शेकडो पिढ्यांना किमान आज दिसते तशी साईमूर्ती बघता येईल, अशी माहिती मूर्तितज्ज्ञांकडून मिळत आहे. साईसमाधी मंदिरातील सध्याची मूर्ती मुंबईचे शिल्पकार भाऊसाहेब ऊर्फ बाळाजी तालीम यांनी बनवलेली आहे. सजीव भासणाऱ्या या मूर्तीची १९५४ साली प्राणप्रतिष्ठा करण्यात आली़  इटालियन मार्बलची ही मूर्ती दिवसेंदिवस झिजत आहे.

मूर्तीच्या दाढी, मिशांचे केस, हातापायांची नखे सध्याच झिजली आहेत. या मूर्तीची काळजी घेतली नाही तर भविष्यात ही मूर्ती विठ्ठलाच्या मूर्तीसारखी गुळगुळीत होण्याची भीती मूर्तिकार तालीम यांनी मूर्तीच्या पंचविसाव्या वर्धापनदिनीच व्यक्त केली होती. 

लोकमत’ने २००६ सालीच वेधले लक्ष  मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमचे माजी संचालक पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर यांनीही याबाबत संस्थानला वारंवार सूचना केल्या होत्या.२००६ साली ‘लोकमत’ने गोरक्षकरांच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर संस्थानने मूर्तीच्या स्नानासाठी अतिगरम पाणी, दही-दुधाचा वापर कमी केला.मार्बल नैसर्गिकदृष्ट्या थंड असल्याने गरम पाण्याने ते ठिसूळ होते. दही-दुधात असलेल्या आम्लाचाही मूर्तीवर विपरीत परिणाम होतो, या बाबींकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते.मूर्तीला रोज स्नान घालण्यास व टॉवेलने पुसण्यास गोरक्षकर यांनी मनाई केलेली होती. त्याकडे फारसे गांभीर्याने बघितले जात नाही. 

प्रत्येक मूर्ती, वस्तूचे एक आयुष्य असते. कालांतराने मूर्तीची झीज, नैसर्गिक आपत्तीमुळे तुटफूट झाल्यास तिचे सौंदर्य कमी होते. या पार्श्वभूमीवर मूर्तीचे थ्रीडी स्कॅनिंग करून मूर्तीचा डाटा संरक्षित करता येतो. भविष्यात ही मूर्ती बदलायची असल्यास या डाटाचा वापर करून हुबेहूब आज दिसणारी मूर्ती कोणत्याही आकारात बनवता येईल.  - प्रशांत बंगाळ, संतोष चव्हाण,संचालक, कार्व टेक, पुणे

मूर्तीची झीज होत आहे़, अशी मूर्ती पुन्हा होणार नाही, तिची काळजी घ्यायला हवी. - प्रकाश खोत, माजी प्रमुख, साई मंदिर

 

टॅग्स :shirdiशिर्डीSaibaba Mandirसाईबाबा मंदिरsaibabaसाईबाबा