नगरमध्ये आमरण उपोषण करणाऱ्या तरुणाची प्रकृती खालावली
By अण्णा नवथर | Updated: November 2, 2023 13:25 IST2023-11-02T13:22:31+5:302023-11-02T13:25:33+5:30
उपचारासाठी शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नगरमध्ये आमरण उपोषण करणाऱ्या तरुणाची प्रकृती खालावली
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करत असलेल्या नगर मधील एका तरुणाची प्रकृती गुरुवारी सकाळी खालावली. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नवनाथ काळे ( रा.नागापूर ) असे या तरुणाचे नाव आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलेले आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून नगर शहरातील तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आलेले आहे. यातील नवनाथ काळे, गोरख दळवी, अमोल हूंबे, संतोष आजबे या चार मराठा तरुणांनी आमरण उपोषण सुरू केलेले आहे. यातील नवनाथ काळे या तरुणाची प्रकृती खालवली. त्यांना उपचारासाठी शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.