मुलीनेच कालवले जेवणात विष, कुटुंबातील चौघांना विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर; थेरवडीतील घटना
By सुदाम देशमुख | Updated: February 26, 2025 22:43 IST2025-02-26T22:39:27+5:302025-02-26T22:43:05+5:30
Ahilyanagar Crime News: कर्जत तालुक्यातील थेरवडी येथील एकाच कुटुंबातील चौघांना जेवणातून विषारी औषध दिल्याने सर्वांना विषबाधा झाली. सर्वांना तत्काळ रुग्णालयात दाखल केल्याने पुढील अनर्थ टळला. आता सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे.

मुलीनेच कालवले जेवणात विष, कुटुंबातील चौघांना विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर; थेरवडीतील घटना
अहिल्यानगर - कर्जत तालुक्यातील थेरवडी येथील एकाच कुटुंबातील चौघांना जेवणातून विषारी औषध दिल्याने सर्वांना विषबाधा झाली. सर्वांना तत्काळ रुग्णालयात दाखल केल्याने पुढील अनर्थ टळला. आता सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे.
थेरवडी येथील एक मुलगी पालकांना न सांगता घरातून बेपत्ता झाली होती. याबाबत कर्जत पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी सदर मुलीच्या मोबाइल लोकेशनच्या आधारे ठावठिकाणा शोधून पालकांच्या ताब्यात त्या मुलीला दिले होते. मुलगी घरी आल्यावर कुटुंबाशी वाद झाल्याने तिने सर्वांच्या जेवणात विषारी औषध टाकून स्वत:ही ते खाल्ले. घरातील सर्वांनाच त्रास होऊ लागला. त्यामुळे सर्वांनाच तातडीने राशीन येथील खासगी दवाखान्यात दाखल केले गेले. त्यांना तत्काळ त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली. याबाबत पोलिसात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले.