ठाकरे सरकार करंटे; देवयानी फरांदे यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 16:10 IST2020-11-29T16:09:06+5:302020-11-29T16:10:05+5:30
तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी हेच राज्य सरकारचे धोरण आहे. कोरोना महामारीच्या काळात सामान्य लोकांना सरकारकडून एक रुपयाचीही मदत मिळाली नाही. त्यामुळे हे सरकार करंटे असल्याची टिका भाजपच्या प्रदेश सरचिटणीस, आमदार देवयानी फरांदे यांनी केली.

ठाकरे सरकार करंटे; देवयानी फरांदे यांची टीका
अहमदनगर : तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी हेच राज्य सरकारचे धोरण आहे. कोरोना महामारीच्या काळात सामान्य लोकांना सरकारकडून एक रुपयाचीही मदत मिळाली नाही. त्यामुळे हे सरकार करंटे असल्याची टिका भाजपच्या प्रदेश सरचिटणीस, आमदार देवयानी फरांदे यांनी केली.
नगर शहर भाजपच्या कार्यकतार् शिबीरात रविवारी फरांदे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे केवळ पदावर आहेत. सरकार चालिवण्याचे काम राष्ट्रवादी करीत आहे. तीन पक्षांचे हे सरकार एकमेकांच्या पायात पाय घालून कधीही पडेल. त्यासाठी आम्हाला स्वप्न बघायची किंवा प्रयत्न करायचीही गरज राहणार नाही.
सामान्य लोकांना दिलासा देण्याऐवजी धनदांडग्यांना मदत करीत आहे. वीज बिलामध्ये माफी दिली जात नाही. मात्र मुद्रांक शुल्कात सवलत देऊन सरकारने बिल्डरांचे भले केल्याचे आरोपही फरांदे यांनी यावेळी केला.