कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
By सुदाम देशमुख | Updated: June 15, 2025 12:05 IST2025-06-15T12:02:55+5:302025-06-15T12:05:41+5:30
संगमनेर तालुक्यातील कोकणगाव शिवारात निझर्णेश्वर महादेव फाट्यावर भीषण अपघात झाला.

कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
आश्वी (जिल्हा अहिल्यानगर): संगमनेर तालुक्यातील कोकणगाव शिवारात निझर्णेश्वर महादेव फाट्यावर भीषण अपघात झाला. साई भक्तांची ट्रॅव्हल बस व आंबे वाहतूक करणाऱ्या मालट्रकचा रविवारी सकाळी सहा वाजता अपघात झाला. या अपघातात तीन ठार दहा गंभीर जखमी झाले आहेत.
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर कोकणगाव शिवारात रविवारी सकाळी सहा वाजण्याचा सुमारास निझर्णेश्वर महादेव फाट्याजवळ साई भक्तांची ट्रॅव्हल बस क्रमांक (एम एच ४६सी यु २७५४) ही बस संगमनेरकडुन लोणीकडे जात असताना व लोणीहून संगमनेरकडे आंबे घेऊन जात असलेल्या मालट्रक (क्रमांक एम एच १२ एम एक्स १४५४ )चा वेगावर नियंत्रण न ठेवता आल्याने समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात प्रवीण सोपान कांदळकर (वय २८ राहणार सुकेवाडी संगमनेर),फिरोज लाला शेख (वय. ४६ राहणार कासारा दुमला संगमनेर), अंजुम प्रवीण वालमीकी( वय ३९ पाणीपत हारीयाणा) हे तिघे ठार झाले.
हर्षिता सोनु वाल्मिक, पुनम बिर्ला,सोनिया बिर्ला, रिया चावरिया,ऐश्वर्या चंद्रशेखर पाटील लत्ता सुरेश चक्रनारायन (सर्व राहणार मुंबई), प्रथमेश राजेंद्र कोल्हे (पोहेगाव ता. कोपरगाव), मोहम्मद रफिक शेख( नाईकवाडापुरा संगमनेर) हे गंभीर जखमी असुन त्यांच्यावर संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघाताचे वृत्त संगमनेर तालुका पोलीस स्टेशन ला समजताच पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे, पोलीस हेडकाॅन्सटेबल राजेंद्र लांगे,हेडकाॅन्सटेबल आशीष आठवडे,पोलीस हेडकाॅन्सटेबल सचिन उगले,पोलीस नाईक धनंजय महाले हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थाच्या मदत्तीने जखमींना उपचारासाठी संगमनेरला पाठवले.