शिक्षकांचे धरणे आंदोलन
By Admin | Updated: June 27, 2014 00:20 IST2014-06-26T23:58:39+5:302014-06-27T00:20:02+5:30
अहमदनगर: माध्यमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले़

शिक्षकांचे धरणे आंदोलन
अहमदनगर: शिक्षकांना अतिरिक्त ठरविणारा निर्णय स्थगित न करता रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी माध्यमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिक्षकांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालसमोर धरणे धरले़ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले़ हा निर्णय रद्द न केल्यास जेलभरो आंदोलन करणार असल्याचा इशारा संघाने दिला आहे़
जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष लगड यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी हे आंदोलन केले़ जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, माध्यमिक शाळांतील पटसंख्येनुसार शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ हा निर्णय माध्यमिक शिक्षकांना मान्य नाही़ जुन्या पध्दतीने शिक्षक संच निश्चित केल्यास शिक्षक अतिरिक्त होण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही़ याविषयी संघटनेने आ़ सुधीर तांबे यांच्याशी चर्चा केली असून, याविषयी शासनाशी बोलणी करण्याचे सर्व अधिकार संघटनेने आ़ तांबे व विक्रम काळे यांना दिले आहेत़ त्यानुसार तांबे यांनी शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्याशी चर्चा केली़ याचर्चेला यश आले असून, या निर्णयास दर्डा यांनी स्थगिती दिली आहे़ आरटीईनुसार ५ ते ८ वीच्या वर्गासाठी नवीन पदे निर्माण करावीत़ ही पदे निर्माण झाल्यास सुमारे ३९ हजार बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील़ शिक्षकांनी संघटनेच्या पाठीमागे उभे राहावे, असे आवाहन संघाचे जिल्हाध्यक्ष एम़ एस़ लगड, जिल्हा सचिव आप्पासाहेब शिंदे, राज्यकोषाध्यक्ष राजेंद्र लांडे, चांगदेव कडू यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)