शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बॅँक निवडणूक : अंतिम यादी १३ जानेवारीला

By admin | Updated: December 15, 2015 23:11 IST

अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची प्रारुप मतदार यादी मंगळवारी जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी जाहीर केली आहे.

अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची प्रारुप मतदार यादी मंगळवारी जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी जाहीर केली आहे. या यादीत ९ हजार ८५३ मतदार असून यादीवर येत्या २८ तारखेपर्यंत हरकती घेता येणार आहेत. त्यानंतर १३ जानेवारीला अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार असून त्यानंतर प्रत्यक्षात दहा दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. १२ हजार शिक्षक सभासद असणाऱ्या शिक्षक बँकेची निवडणूक रणधुमाळी पेटली आहे. उपनिबंधक यांनी यादी प्रसिद्ध करताच, पहिल्या दिवसापासून उपनिबंधक कार्यालयातील शिक्षक पुढाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. बँकेच्या २१ संचालकांच्या जागेसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. २८ तारखपर्यंत प्रारुप मतदार यादीवर हरकती घेण्यात येणार असून आलेल्या सर्व हकरतींवर ७ तारखेला निकाल देण्यात येणार आहे. त्यानंतर १३ जानेवारीला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. प्रारुप यादी प्रसिद्ध होताच शिक्षक संघटनांमधील स्पर्धा चांगलीच वाढली आहे. कोणत्याही परिस्थितीत बँकेच्या आर्थिक नाड्या आपल्या हाती राहव्यात, यासाठी शिक्षक संघटना सरसावल्या आहेत. चार प्रमुख मंडळांसह अन्य लहान मोठ्या संघटना निवडणुकीसाठी सज्ज झाल्या आहेत. यंदाची निवडणूक चांगलीच गाजणार असून शिक्षक सभासदांना आपल्या बाजूने आकर्षित करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब होताना दिसत आहे. (प्रतिनिधी)