शहरं
Join us  
Trending Stories
1
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
2
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
3
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
4
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
5
भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...
6
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
7
Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
8
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
9
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
10
"अजित पवारांनी २५ वर्षे ही माहिती का दडवली?", ३१०  कोटींच्या प्रकल्पावरून एकनाथ खडसे यांनी घेरले, गंभीर मुद्द्यांवर बोट
11
मकरसंक्रांतीच्या दिवशीच दुर्दैवी घटना; चायनीज मांजाने गळा कापल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
12
"विराट आणि रोहित सतत गौतम गंभीरशी..."; टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने सगळंच सांगून टाकलं!
13
मुंबई मनपामध्ये भाजपापेक्षा स्ट्राईक रेट चांगला असल्यास महापौरपदावर दावा करणार का? शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले...
14
Affordable Cars: कमी पगार असूनही खरेदी करू शकता 'या' ५ स्वस्त आणि मस्त कार!
15
KL Rahul Century : स्टायलिश बॅटर केएल राहुलची क्लास सेंच्युरी! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
विजय केडिया यांची मोठी गुंतवणूक, या स्मॉलकॅप स्टॉकवर लावला तगडा डाव; खरेदी केले १००००००० शेअर
17
Makar Sankranti 2026: संक्रांतीच्या संध्याकाळी तुळशीजवळ करा 'हे' २ छोटे उपाय; वर्षभर राहील लक्ष्मीची कृपा!
18
पालक पनीर गरम केल्याने राडा; युनिव्हर्सिटीला २ भारतीय विद्यार्थ्यांना द्यावे लागले १.८ कोटी
19
US-इराण लढाईत पाकिस्तान अडकला, ३ संकटांनी घेरलं; असीम मुनीर यांनी बोलावली तातडीची बैठक
20
धुळ्यात हजारो मतदान कार्डांचा साठा सापडला; एमआयएमचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चिंचेचं गाव... 30 वर्षांपूर्वी लावलेल्या 150 झाडांनी बदललं गावचं 'अर्थ'कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 10:27 IST

नगर - चिंचेचं गाव म्हणून नगर तालुक्यातील मांडवे गावची ओळख बनली आहे. या गावचे सौंदर्यच या झाडांनी बहरुन गेले ...

नगर - चिंचेचं गाव म्हणून नगर तालुक्यातील मांडवे गावची ओळख बनली आहे. या गावचे सौंदर्यच या झाडांनी बहरुन गेले आहे. एवढेच काय गावाला भरगच्च उत्पन्न मिळवून देणारी गावाची चिंचेची झाडं गावातील अर्थकारणाचा महत्त्वाचा हिस्सा बनली आहेत. मांडवे गावचे माजी सरपंच साहेबराव लक्ष्मण निमसे यांनी १९९० रोजी ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेत चिंचेची सुमारे दीडशे झाडे लावली होती. आता ही झाडे वटवृक्षासारखी मोठी झाली आहेत.

गावात प्रवेश करताच चिंचेची डेरेदार झाडे नजरेत भरतात. यापैकी ११५ झाडांना चांगल्या चिंचा आल्या आहेत. दहा वर्षांपासून या झाडांना चिंचा येत आहेत. दरवर्षी पन्नास हजार रुपयांपर्यंत चिंचेचा लिलाव होतो. या वर्षी सव्वा लाख रुपयांपर्यंत चिंचेचा लिलाव होईल, अशी अपेक्षा आहे. या चिंचेच्या झाडांमुळे गावातील मुख्य चौकामध्ये सर्वत्र गार हवा, आराम करण्यासाठी छान सावली मिळत आहे. चौकाजवळ शाळा असल्यामुळे मुलांना खेळण्यासाठी या झाडांचा चांगला फायदा होत आहे. गावात काही कार्यक्रम असेल तर या झाडांच्या सावलीखालीच ते पार पाडले जातात. गावाच्या चोहोबाजूंनी हे चिंचेची झाडे लावण्यात आली आहेत. गावात जवळपास प्रत्येकाच्या घरासमोर तसेच वस्तीवर मोठ्या प्रमाणात चिंचेची झाडे आहेत. या झाडांमुळे आर्थिक उत्पन्न चांगले मिळते. ही चिंचेची झाडे गावातील अर्थकारणाचा महत्त्वाचा भाग बनत असून या उत्पन्नामुळे गावातील विकास कार्याला हातभार लागत आहे.

गावात सर्वत्र चिंचेची झाडे असल्यामुळे गावात प्रसन्न व शांत वाटते. गावातील ग्रामपंचायतीच्या जागा संपल्यामुळे झाडे लावण्यास जागा राहिली नाही. तरीही जेथे जागा उपलब्ध होईल तेथे वृक्षारोपण करीत असतो. ही झाडे जगविण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. त्यामुळेच आज टवटवीत झाडे पाहावयास मिळत असून, या झाडांमुळे गावातील सौंदर्यात भर पडली आहे.

- सुभाष निमसे,

सरपंच, मांडवे

टॅग्स :AhmednagarअहमदनगरEconomyअर्थव्यवस्थाsarpanchसरपंच