जलतरणात चमकली ‘प्रतिभा’

By Admin | Updated: September 23, 2014 23:02 IST2014-09-23T22:58:39+5:302014-09-23T23:02:36+5:30

राहुरी : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ग्रामीण भागातून एक महिला जलतरणपटू पुढे येत आहे.

Swirling 'Talent' | जलतरणात चमकली ‘प्रतिभा’

जलतरणात चमकली ‘प्रतिभा’

राहुरी : लहानपणापासून पोहण्याची आवड, घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही पालकांनी दिलेले प्रोत्साहन, सरावाची कुठलीही सोय नसल्याने शेततलावात पोहण्याची वेळ... अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ग्रामीण भागातून एक महिला जलतरणपटू पुढे येत आहे.
घोरपडवाडी (ता. राहुरी) येथील प्रतिभा संताराम बाचकर असे तिचे नाव. अहमदनगर येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत प्रतिभाने तीन प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवला. १०० मीटर फ्री स्टाईल, १०० मीटर बॅक स्ट्रोक व २०० मीटर बॅक स्ट्रोक या तीनही प्रकारात तिने बाजी मारली.
प्रतिभा ही भागिरथीबाई कन्या विद्यालयात दहावीत शिकते आहे. आतापर्यंत तिने जिल्हा व विभागीय पातळीवर पंधरापेक्षा अधिक पदकांची कमाई केली आहे. प्रतिभाच्या वडिलांनी तिच्या सरावासाठी घरीच शेततळे तयार करून तिला प्रोत्साहान दिले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने बाहेर सराव करण्यास मर्यादा येत आहेत.
तिसरीला असतानाच प्रतिभा चांगल्या प्रकारे पोहू लागली़ वडिलांनी प्रतिभाला सर्व स्पर्धांत उतरवले. सर्व ठिकाणी तिने यश संपादन केले़ प्रतिभाचा लहान भाऊही पोहण्याचा सराव क रीत आहे़

 

Web Title: Swirling 'Talent'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.