शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
2
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
3
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
4
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
6
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
7
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
8
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
9
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
10
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
12
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
13
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
14
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
15
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
16
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
17
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
18
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
19
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
20
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार

"कार्यकर्त्याला सोडून बाहेरच्यांना उमेदवारी"; श्रीगोंद्यात सुवर्णा पाचपुतेंचा BJPला इशारा: म्हणाल्या, "जनतेचे काही होऊद्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 13:00 IST

Suvarna Pachpute : श्रीगोंदा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराची घोषणा झाल्यानंतर सुवर्णा पाचपुते यांनी नाराजी व्यक्त केली.

Shrigonda Vidhan Sabha : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच अनेक राजकीय घडामोडींना आणि भेटीगाठींना वेग आला आहे. दुसरीकडे भाजपच्या उमेदवरांच्या यादीनंतर बंडखोरी होण्यास सुरुवात झाली आहे. भाजपने श्रीगोंदा मतदारसंघातून विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी  प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या पदाधिकारी सुवर्णा पाचपुते यांनी बंडखोरीचे निशाण फडकवलं आहे. पक्ष बाहेरुन आलेल्यांनाच उमेदवारी देत असल्याचे म्हणत आपण अपक्ष लढू असे सुवर्णा पाचपुते यांनी म्हटलं आहे.

श्रीगोंदा मतदारसंघातून भाजपने पुन्हा पाचपुते कुटुंबीयांना तिकीट दिल्याने सुवर्णा पाचपुते प्रचंड नाराज आहेत. प्रतिभा पाचपुतेंच्या नावाची घोषणा होताच सुवर्णा पाचपुते यांना अश्रू अनावर झाले. मी इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. फक्त मला पक्षाला माझी ताकद दाखवून द्यायची आहे, असा इशारा सुवर्णा पाचपुते यांनी दिला आहे. यासोबतच सुवर्णा पाचपुते यांनी आपल्या कार्यालयातील भाजप नेत्यांचे फोटो आणि चिन्ह हटवले आहे. दुसरीकडे, बबनराव पाचपुते यांनीही आम्हाला त्यांच्या बंडखोरीचे आव्हान वाटत नसल्याचे म्हटलं आहे. 

"लोकांचा मला इतका आधार मिळाला आहे की आज माझ्या डोळ्यात पाणी येतय पण ते खाली येत नाही. याचे कारण माझ्या मागे असलेला लोकांचा पाठिंबा हा आहे. लोक मला सांगत आहेत की कसंही करा आणि उभं राहा. पण मी एक करणार आहे. पक्ष ही माझी विचारधारा होती. लढले तर मी अपक्ष लढेल आणि इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. फक्त मला पक्षाला माझी ताकद दाखवून द्यायची आहे," असा इशारा सुवर्णा पाचपुते यांनी दिला आहे.

"मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून भाजपने उमेदवारी न देता बाहेरून पक्षात आलेल्या प्रस्थापितांनाच पक्ष उमेदवारी देत आहे. पक्ष धृतराष्ट्रासारखा झाला आहे. महाभारत होऊ द्या. जनतेचे काहीही होऊ द्या. फक्त आमची सत्ता आली पाहिजे हे पक्षाचे ध्येयधोरण आहे,: असेही सुवर्णा पाचपुते म्हणाल्या.

सुवर्णा पाचपुतेंच्या इशाऱ्यानंतर श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी भाष्य केलं आहे. "आम्हाला त्यांच्या बंडखोरीचे आव्हान वाटत नाही. त्यांनी अपक्ष उभं राहावं," असे प्रत्युत्तर बबनराव पाचपुते यांनी म्हटलं.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकBabanrao Pachaputeबबनराव पाचपुतेBJPभाजपा