संगमनेर तालुक्यातील राजापूर गावात शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 15:55 IST2017-11-21T15:54:28+5:302017-11-21T15:55:50+5:30

संगमनेर : तालुक्यातील राजापूर गावातील शेतकरी तुकाराम हासे (वय ४४, रा. हासे मळा) यांनी शेतातील चिंचेच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने ...

Suicide by taking robbery of farmer at Rajapur village in Sangamner taluka | संगमनेर तालुक्यातील राजापूर गावात शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

संगमनेर तालुक्यातील राजापूर गावात शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

संगमनेर : तालुक्यातील राजापूर गावातील शेतकरी तुकाराम हासे (वय ४४, रा. हासे मळा) यांनी शेतातील चिंचेच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंळवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास निदर्शनास आली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तुकाराम हासे आपल्या कुटूंबासमवेत राजापुर येथील हासे मळा येथे राहता. रात्री वीज आल्यानंतर पिकांना पाणी देण्यासाठी ते शेतात गेले होते. सकाळी सहावाजून गेल्यानंतरही ते घरी न आल्याने त्यांची पत्नी त्यांना पाण्यासाठी शेतात गेल्या. तेव्हा त्यांना घरापासून जवळच असलेल्या शेतातील चिंचेच्या झाडाला तुकाराम हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कॉटेज रूग्णालयात नेण्यात आला. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय गोरे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Suicide by taking robbery of farmer at Rajapur village in Sangamner taluka