माहिजळगाव येथे शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 13:44 IST2020-07-10T13:43:11+5:302020-07-10T13:44:04+5:30
कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे शुक्रवारी (दि.१० जुलै) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भाऊसाहेब आश्रू कसाब (देशमुख) (वय ६०) या शेतक-याने नगर-सोलापूर महामार्गानजीक स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

माहिजळगाव येथे शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या
मिरजगाव : कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे शुक्रवारी (दि.१० जुलै) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भाऊसाहेब आश्रू कसाब (देशमुख) (वय ६०) या शेतक-याने नगर-सोलापूर महामार्गानजीक स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
शुक्रवारी सकाळी भाऊसाहेब कसाब हे विहिरीवरून पाणी घेऊन येतो असे सांगून सायकल घेऊन घरून निघाले. शेतात आल्यानंतर विहिरीवर सायकल लावून त्यांनी लिंबाच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेतला. त्यांच्या मागे पत्नी, विवाहित मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
या घटनेची माहिती पोलीस पाटील हनुमंत शिंदे यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. आत्महत्येचे निश्चित कारण समजले नाही.