नवीन तंत्राचा अवलंब करून ऊस लागवड करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:30 IST2021-02-05T06:30:34+5:302021-02-05T06:30:34+5:30
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व कृषी विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. २) शॅम्प्रो सभागृहात ...

नवीन तंत्राचा अवलंब करून ऊस लागवड करावी
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व कृषी विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. २) शॅम्प्रो सभागृहात आयोजित शेतकरी प्रशिक्षण मेळाव्यात भास्कर बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, कृषिभूषण आनंद गाडेकर, विनोद हासे, दादासाहेब कुटे, संपत गोडगे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, मंडल कृषी अधिकारी अशोक कव्हाड, शेतकरी अधिकारी भाऊसाहेब खर्डे, ऊस विकास अधिकारी सुरेश थोरात, अविनाश वर्पे, बाळासाहेब सोनवणे, बबन सावंत, राजाराम पवार, वैभव कानवडे आदी उपस्थित होते.
भास्कर म्हणाले, शेतकऱ्यांनी ऊस लागवड करताना सुरुवातीला मशागत चांगली करावी. साडेचार फुटाची सरी तयार करावी. त्यानंतर जास्त उत्पादन देणाऱ्या जातीची निवड करावी. बेणे घेताना चांगले घ्यावे. अंतर आणि उत्पादनाचा चांगला संबंध आहे. प्रत्येक रोपाचे सात फुटवे घ्यावे. त्यापासून एकरी ९० ते १०० टनांपर्यंत उत्पादन मिळू शकते. जमीन सुपीकतेसाठी आपल्या शेतात सेंद्रीय कर्ब वाढविण्यासाठी जास्तीत जास्त शेणखताचा किंवा पोल्ट्री खत, गांडूळ खत, करंजी, निंबोळी पेंड यांचा वापर करावा. शेतकऱ्यांनी खोडवा व्यवस्थापन समजून घेणे आवश्यक आहे. व्यवस्थापन करताना पाचट, अच्छादन, जैविक खतांचा वापर करून ऊस शेती करताना पाचट न जाळता अच्छादन करावे. यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी शेंडे यांनी केले. सूत्रसंचालन ऊस विकास अधिकारी सुरेश थोरात यांनी केले. नामदेव कहांडळ यांनी आभार मानले.