वादळी पावसाने ऊस, बाजरीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 12:28 IST2020-09-09T12:27:18+5:302020-09-09T12:28:31+5:30
जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे, सांगवी सूर्या, राळेगण थेरपाळ, पठारवाडी, गुणोरे व परिसरात सोमवारी रात्री झालेल्या जोरदार वादळी वाºयासह पावसाने शेतकºयांच्या शेतातील ऊस, बाजरी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वादळी पावसाने ऊस, बाजरीचे नुकसान
जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे, सांगवी सूर्या, राळेगण थेरपाळ, पठारवाडी, गुणोरे व परिसरात सोमवारी रात्री झालेल्या जोरदार वादळी वाºयासह पावसाने शेतकºयांच्या शेतातील ऊस, बाजरी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सोमवारी रात्री झालेला एक तासाचा पाऊस ७१ मि. मी. झाला असून सात सप्टेंबर २०२० अखेर ३५६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी ७ सप्टेंबरअखेर १७९ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती जवळे जलसिंचन कुकडी विभाग अधिकारी प्रकाश बडवे यांनी दिली.
चालू वर्षी कोरोनामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली होती. त्यातच अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेतकºयांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असल्याने पिकाचे पंचनामे करावेत, अशी मागणी परिसरातील शेतकºयांकडून होत आहे.
तहसीलदार, कृषी विभाग यांच्याकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर झालेल्या पिकांची पंचनामे करण्यात येतील, अशी माहिती कामगार तलाठी आकाश जोशी यांनी दिली.
जवळे येथील ऊस उत्पादक शेतकरी निलेश बाबुराव पठारे यांच्या शेतातील चार एकर ऊस सोमवारी झालेल्या पावसाने भुईसपाट झाला. यामुळे चार ते पाच लाखाचे नुकसान झाले आहे. ऊस ११ महिन्याच्या झाला असून चार एकरासाठी सव्वा लाखाचा खर्च झालेला आहे. दोन महिन्यानंतर ऊस तोडणार होतो. परंतु पावसाने उत्पादनात घट होणार असल्याचे पठारे म्हणाले. एकीकडे पिकांचे नुकसान झालेले असताना दुसरीकडे परिसरातील ओढे-नाले ही भरून वाहत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.