गाळप हंगामापूर्वी साखर कारखान्यांना करावा लागणार संपाचा सामना

By अरुण वाघमोडे | Updated: October 9, 2023 16:00 IST2023-10-09T15:59:36+5:302023-10-09T16:00:26+5:30

महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियननेही याच मागण्यांसाठी संप पुकारला आहे.

Sugar mills will have to face a strike before the sugar season | गाळप हंगामापूर्वी साखर कारखान्यांना करावा लागणार संपाचा सामना

गाळप हंगामापूर्वी साखर कारखान्यांना करावा लागणार संपाचा सामना

अहमदनगर: ऊसतोड मजूर, मुकादम व वाहतूकदार यांना शासनाकडून ५९ टक्के दरवाढ मिळावी, या मागणीसाठी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने ऊसतोड मजुरांचा संप पुकारल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियननेही याच मागण्यांसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे यंदा साखर कारखान्यांना गाळप हंगामापूर्वी संपाचा सामना करावा लागणार आहे.

उसतोडणी कामगार मुकादम व वाहतूकदार यांना कारखान्याकडून दिल्या जाणाऱ्या दरात ५० टक्के वाढ करावी, अन्यथा उसतोडणी कामगार बेमुदत संपावर जाणार असल्याचा ईशारा महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी वाहतूक, मुकादम कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांनी सोमवारी नगर येथे माध्यमांशी बोलताना दिला. ते म्हणाले सध्या ऊसतोड कामगाराला डोकी सेंटरला २७३, गाडी सेंटर व टायर बैलगाडीला ३०४ रुपये प्रति टन तर किलोमीटरला १४ रुपये टनाला पैसे मिळत आहे.

मात्र सध्याच्या महागाईचा आणि मजुरीचा दर पाहता हे पैसे पुरेसे नाहीत. ऊस तोडणी कामगारांच्या मजुरी बाबतच्या कराराला तीन वर्षे पूर्ण होत झाले आहेत. त्यामुळे शासनाने सध्या मिळत असलेल्या तोडणी कामगाराच्या दरात ५० टक्के वाढ करावी, अशी आमची मागणी आहे. याबाबत राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष यांना निवेदन दिले आहे.
 

Web Title: Sugar mills will have to face a strike before the sugar season