शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्यातील विद्यार्थी-संशोधकांचा राष्ट्रीयस्तरावर डंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST

श्रीगोंदा/देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागातील संशोधक विद्यार्थ्यांची टाकाऊ केळीच्या सालीपासून सेंद्रिय शू पॉलिश तयार करणाऱ्या प्रकल्पाची राष्ट्रीयस्तरावर उत्कृष्ट ...

श्रीगोंदा/देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागातील संशोधक विद्यार्थ्यांची टाकाऊ केळीच्या सालीपासून सेंद्रिय शू पॉलिश तयार करणाऱ्या प्रकल्पाची राष्ट्रीयस्तरावर उत्कृष्ट नवकल्पना म्हणून निवड झाली आहे.

तालुक्यातील कोंडेगव्हाण येथील निखिल संजय मगर व लोणी व्यंकनाथ येथील ऋषीकेश अशोक लबडे या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केळीच्या सालीपासून सेंद्रिय शू-पॉलिश विकसित केली. हे दोघे शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे विद्यार्थी असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे हा प्रकल्प राष्ट्रीयस्तरावर सादर करण्यात आला होता. या प्रकल्पाची केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे उत्कृष्ट नवकल्पना म्हणून निवड करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर आणि सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युवेशन अँड लिंकेजेसच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांच्या

प्रोत्साहनातून हा प्रकल्प गेल्यावर्षी राष्ट्रीय स्पर्धेत सादर करण्यात आला होता, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.सी. मोहिते यांनी सांगितले. प्रा. नारायण घनगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रकल्प तयार केला. महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा आणि सचिव नंदकुमार

निकम यांनी संशोधनासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या.

---

विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाच्या क्षमता असतात. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. ग्रामीण भागातील गरजा

ओळखून, त्याला पूरक संशोधन करणे गरजेचे आहे. त्यातूनच खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारताचे स्वप्न

पूर्ण होईल.

- डॉ. के.सी. मोहिते,

प्राचार्य, चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय, शिरूर

----

चौकट :

आमच्या प्रकल्पाचे रोपटे श्रीगोंद्यातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील डॉ. योगेश अहिरे यांच्या मार्गदर्शनात रुजले. त्याला वटवृक्षात रूपांतर करायचे काम चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालातील डॉ. नारायण घनगावकर यांनी मार्गदर्शन करताना परिस्थिती गरीब असल्यामुळे प्रकल्पाला लागणारी आर्थिक मदतही केली. प्राचार्य डॉ. के.सी. मोहिते यांनी सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या. आर्थिक पाठबळ मिळाले तर स्वतःचा उद्योग उभा करू शकतो.

-निखिल मगर, ऋषीकेश लबडे

संशोधक विद्यार्थी

----

फोटो

०९निखिल मगर, ०९ऋषिकेश लबडे