गावठी कट्टा विकणा-यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 18:01 IST2018-05-19T18:00:49+5:302018-05-19T18:01:45+5:30
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोपरगाव रोडवरील सावळीविहीर फाटा येथे गावठी कट्टा विक्री करण्यास आलेल्या तरूणाला अटक केली.

गावठी कट्टा विकणा-यास अटक
अहमदनगर: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोपरगाव रोडवरील सावळीविहीर फाटा येथे गावठी कट्टा विक्री करण्यास आलेल्या तरूणाला अटक केली. शनिवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
शिवाजी हरिभाऊ फुंदे (वय २७ रा. संतनगर, शिर्डी) असे ताब्यात घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. त्याच्याकडून २५ हजार रूपये कितीचा एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस असा एकूण ३५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फुंदे याच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.