शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

वादळाने केळीची बाग उद्ध्वस्त

By admin | Updated: June 3, 2014 00:27 IST

कुकाणा : नेवासा तालुक्यातील देवगाव व परिसरात रविवारी रात्री सात वाजेच्या दरम्यान वादळी वार्‍यासह झालेल्या जोरदार पावसाने केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले़

कुकाणा : नेवासा तालुक्यातील देवगाव व परिसरात रविवारी रात्री सात वाजेच्या दरम्यान वादळी वार्‍यासह झालेल्या जोरदार पावसाने केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले़ चार महिन्यापूर्वी झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप न मिळाली नसतानाच पुन्हा अवकाळी पावसाने शेतकर्‍यांना जोरदार तडाखा बसला आहे़ देवगाव (ता. नेवासा) येथील प्रगतशील शेतकरी गोरक्षनाथ आसाराम गायकवाड यांनी यंदा तीन एकरात साडेचार हजार केळी पीक घेतले आहे़ केळीला केळी आल्या आहेत़ त्यांनी खत, पाणी आणि जोपासणीसाठी लाखो रुपये खर्च केला़ मात्र, रविवारी (दि़१) रात्री रोजदार वादळ आणि त्यानंतर झालेल्या पावसाने केळीची झाडे उन्मळून पडली़ गायकवाड यांच्या शेतातील सुमारे साडेचारशे ते पाचशे झाडे मोडून पडल्याने अंदाजे दोन-तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे़ गायकवाड यांचे शेजारी एकनाथ दगडू भुजबळ यांचीही दोन एकरात केळीची बाग होती़ वादळाने भुजबळ यांचीही बाग उद्ध्वस्त झाली आहे़ भुजबळ यांच्या बागेतील केळची झाडे आठ महिन्यांची होती़ ही केळीची झाडे वादळामुळे मधोमध चिरली गेली आहेत़ त्यामुळे त्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले. या पिकाचे पंचनामे होऊन नुकसान भरपायी मिळावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे. (वार्ताहर)तीन एकरात सुमारे साडेचार हजार केळीची झाडे लावून त्यांना मुलाबाळाप्रमाणे नऊ महिने जपले. मात्र रविवारी झालेल्या वादळी पावसाने क्षणातच होत्याचे नव्हते झाले़ लाखो रुपये खर्चून बाग उभी केली होती़ आमच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे़ नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा आहे. -गोरक्षनाथ गायकवाड, नुकसानग्रस्त शेतकरी