विडी कामगारांचा रास्ता रोको

By Admin | Updated: April 7, 2016 00:03 IST2016-04-06T23:52:48+5:302016-04-07T00:03:37+5:30

अहमदनगर : विडी बंडलवरील ८५ टक्के धोका चित्र छापण्याची अट रद्द करावी, बंद असलेले विडी कारखाने पूर्ववत सुरू करावे व विडी कामगारांना कामाची भरपाई म्हणून मजुरी मिळावी,

Stop the work of the workers | विडी कामगारांचा रास्ता रोको

विडी कामगारांचा रास्ता रोको

अहमदनगर : विडी बंडलवरील ८५ टक्के धोका चित्र छापण्याची अट रद्द करावी, बंद असलेले विडी कारखाने पूर्ववत सुरू करावे व विडी कामगारांना कामाची भरपाई म्हणून मजुरी मिळावी, या मागणीसाठी राज्य विडी कामगार फेडरेशन, लाल बावटा युनियन व नगर विडी कामगार संघटनेच्या वतीने बुधवारी शहरातील जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रास्ता रोको करण्यात आला़
दुपारच्या रणरणत्या उन्हात महिलांनी जुने बसस्थानक येथील शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर ठिय्या मांडून रास्ता रोको केला. आंदोलनात कॉ. कारभारी उगले, कॉ. शंकर न्यालपेल्ली, शंकर मंगलारप, कॉ. निवृत्ती दातीर, अ‍ॅड. सुधीर टोकेकर, बुचम्मा श्रीमल, शोभा बिमन, कविता मच्चा, लक्ष्मी कोडम आदी सहभागी झाले होते़ विडी बंडलवरील ८५ टक्के धोका चित्र छापण्याची अट रद्द करावी, यासाठी १ एप्रिलपासून पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे विडी कामगारांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे़ विडी कारखाने बंद असल्याने विडी कामगार बेकार होऊन त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकार व विडी मालकांच्या वादामुळे विडी कामगार वेठीस धरला जात आहे. शासनाने कामगारांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, खा़ गांधी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे़
(प्रतिनिधी)

Web Title: Stop the work of the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.