शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

भंडारदरा धरणाचे उन्हाळी आवर्तन बंद

By admin | Updated: March 26, 2024 15:17 IST

अकोले : भंडारदरा धरणातून लाभक्षेञासाठी सुरू असलेले शेतीचे आवर्तन शनिवारी बंद झाले.

अकोले : भंडारदरा धरणातून लाभक्षेञासाठी सुरू असलेले शेतीचे आवर्तन शनिवारी बंद झाले. २४ दिवस चाललेल्या या आवर्तनात ३ हजार २०० दलघफू पाणी वापरात आले. भंडारदरा धरणात १ हजार ७११ दलघफू पाणी शिल्लक आहे. २३ एप्रिल रोजी भंडारदरा धरणातून सिंचनासाठी १ हजार ७०० क्युसेक वेगाने आवर्तन सोडण्यात आले. आवर्तन सुरू होताना भंडारदरा धरणात ४ हजार ४९८ दलघफू पाणीसाठा होता, तर निळवंडेत ७०३ दलघफू पाणी होते. २४ दिवस चाललेल्या आवर्तनासाठी भंडारदरा जलाशयातून ३ हजार २०० दलघफू पाणी खर्ची पडले. आता निळवंडेत २९० दलघफू, तर भंडारदरा धरणात १ हजार ७११ दलघफू पाणी शिल्लक असून राजूर पाणीपुरवठा योजनेसाठी भंडारदर्‍यातून निळवंडेत काही प्रमाणात पाणी सोडले जात आहे. राजूर योजनेच्या विहिरीपर्यंत पाणीसाठा निळवंडेत झाल्यानंतर चार दोन दिवसांनी भंडारर्‍याची मोरी बंद होणार आहे. निवडणुकी मुळे आवर्तनाकडे लक्ष गेले नसले तरी दिर्घकाळ चाललेल्या आवर्तनामुळे लाभक्षेञातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. आढळा मध्यम प्रकल्पात आजअखेर १७४ दलघफू पाणीसाठा असून बुडित क्षेञाबरोबरच हिवरगाव, डोंगरगाव, पाचगाव पाणी पुरवठा योजनेसाठी पाणी राखून ठेवण्यात आल्याचे समजते. सलग पाच वर्षे धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही, तसेच आढळा खोर्‍यातील भूजल पातळी खोल गेल्यामुळे आवर्षणप्रवण क्षेञ दुष्काळाच्या झळा सोसत आहे. माञ पिंपळगाव निपाणी, विरगाव, गणोरे, हिवरगाव भागातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात शेततळे केल्याने शेतीतील फळबागांना चांगला लाभ होत आहे. (तालुका प्रतिनिधी)