शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बोधेगावात रास्ता रोको : ईव्हीएम हटविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 18:33 IST

आगामी विधानसभा निवडणुका ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेवरच घ्याव्यात, पैठण-पंढरपूर मार्गावरील बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी

बोधेगाव : आगामी विधानसभा निवडणुका ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेवरच घ्याव्यात, पैठण-पंढरपूर मार्गावरील बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी बोधेगाव (ता. शेवगाव) येथे बन्नोमाँ दर्गासमोर बुधवारी (दि.२८) रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. वंचित बहुजन आघाडी, एमआयएम व भारिप बहुजन महासंघाचा आंदोलनात सहभाग होता.देशभरात ईव्हीएमविरोधात संशयाचे वातावरण आहे. लोकसभेच्या मतमोजणीच्या बेरजेतील तफावत बºयाच ठिकाणी आढळून आली. त्यामुळे ‘ईव्हीएम हटाओ-देश बचाओ’ असा एल्गार विरोधी पक्षांच्या वतीने देण्यात आला आहे. पैठण-पंढरपूर महामार्गावरील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, दुष्काळग्रस्त शेतकºयांचे सरसकट कर्ज माफ करून रब्बी हंगामाचा पीक विमा देण्यात यावा, बोधेगाव येथे स्वतंत्र पोलीस ठाणे, नवीन बसस्थानक बांधावे अशा प्रमुख मागण्या आंदोलकांच्या होत्या.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश भोसले, प्रथमेश सोनवणे, ‘वंचित’चे संतोष बानाईत, राजू वीर, रावसाहेब निकाळजे, इस्माईल पटेल, बबन मिसाळ यांची भाषणे झाली. आंदोलनासाठी ‘एमआयएम’चे फारूक सय्यद, अविनाश खंडागळे, अन्सार कुरेशी, ‘जनशक्ती’चे माणिक गर्जे, विष्णू वीर, दिगंबर बल्लाळ, दत्तू कनगरे, सुनील घोरपडे, संजय बल्लाळ, सुरेश तोटारे, संजय वाल्हेकर, नबाब शेख, नवनाथ मिसाळ, अन्सार शेख, अनिस सय्यद, प्यारेलाल शेख, जमीर शेख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. नायब तहसीलदार शोभा माळी यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर