Ahmednagar: शेअर मार्केटमध्ये फसवूणक करणाऱ्यास कलकत्ता विमानातळावरून अटक
By अण्णा नवथर | Updated: October 17, 2023 17:13 IST2023-10-17T17:12:17+5:302023-10-17T17:13:43+5:30
Ahmednagar: शेअर मार्केटमध्ये जास्तीचा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत गुंतवणूकदारांची १३ कोटींची फसवणुक करून बँकाकला पळून गेलेल्या आरोपीला कलकत्ता विमानतळावरून साेमवारी पहाटे ताब्यात घेतले. त्याला अहमदनगरला आणण्यात आले असून, त्याची चौकशी सुरू आहे.

Ahmednagar: शेअर मार्केटमध्ये फसवूणक करणाऱ्यास कलकत्ता विमानातळावरून अटक
- अण्णा नवथर
अहमदनगर - शेअर मार्केटमध्ये जास्तीचा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत गुंतवणूकदारांची १३ कोटींची फसवणुक करून बँकाकला पळून गेलेल्या आरोपीला कलकत्ता विमानतळावरून साेमवारी पहाटे ताब्यात घेतले. त्याला अहमदनगरला आणण्यात आले असून, त्याची चौकशी सुरू आहे.
बाळासाहेब निवृत्ती काळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने शेअर मार्केटमध्ये पैसे गंतवणूक केल्यास जास्तीचा नफा मिळून देतो, असे गुंतवणूक करणाऱ्यास सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून अनेकांनी गुतवणूक केली. मात्र त्याने परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेंव्हापासून वरील आरोपी फरार होता. तो बँकांकमध्ये पळून गेला. दरम्यान तपास अर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. पोलिसांनी नोटिस जारी केली.
सोमवारी पहाटे तो बँकांक येथून विमानाने कलकत्ता विमानतळावर आला. तेथील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तशी माहिती अहमदनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांच्या पथकाने कलकत्ता येथून आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याला अहमदनगरला आणण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक कमलाकर जाधव यांनी दिली.