शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कारखानदारीसाठी खडतर हंगाम

By admin | Updated: June 25, 2016 00:38 IST

अहमदनगर : साखर कारखानदारीचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या नगर जिल्ह्यात यंदा उसाचे क्षेत्र निम्म्याने घटले आहे. याचा परिणाम साखर कारखान्यांवर होणार असून

अहमदनगर : साखर कारखानदारीचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या नगर जिल्ह्यात यंदा उसाचे क्षेत्र निम्म्याने घटले आहे. याचा परिणाम साखर कारखान्यांवर होणार असून २२ पैकी किती कारखान्यांचे बॉयलर यंदा पेटणार याबाबत सध्या तरी साशंकता आहे. साखरेचे पडलेले दर, वाढलेला उत्पादन खर्च, सरकारची अनास्था याचा फटका साखर कारखानदारीला बसलेला आहे. या परिस्थितीत कारखानदारी कशी टिकणार,असा प्रश्न आहे. सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून नगरकडे पाहिले जाते. सहकाराचे सर्वात मोठे जाळे नगर जिल्ह्यात असून सहकारी साखर कारखान्यासोबत खासगी साखर कारखानदारी जिल्ह्यात वाढलेली आहे. मात्र, घटलेले पर्जन्यमान, धरणातील पाण्याचा प्रश्न, नगर आणि नाशिक जिल्ह्यातून मराठवाड्याला सोडण्यात येणारे पाणी यामुळे जिल्ह्यातील शेती उजाड झालेली आहे. याचा सर्वात मोठा फटका उसाच्या पिकाला बसलेला आहे. मे महिन्यात प्रादेशिक सहसंचालक कार्यालय( साखर) यांनी काढलेल्या प्राथमिक अंदाजात गतवर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे क्षेत्र निम्म्याने घटले आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात १ लाख १२ हेक्टर क्षेत्रावर उसाचे पीक गाळपासाठी होते. यंदा हे क्षेत्र अवघे ६० हजार ९७२ हेक्टर क्षेत्र असल्याचे या अहवालात म्हटले आहे. गेल्यावर्षी ९२ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप होवून त्यातून १ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले होते. साखर उताराही १०.९५ टक्के निघाला होता. उसाच्या कमतरतेमुळे यंदा ऊस तोडणी मजुरांवर बेकारीची कुऱ्हाड राहणार आहे. जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांना दीड लाखांच्या जवळपास कामगारांची गरज असते. यंदा निम्म्याने कारखाने बंद राहिल्यास त्याचा परिणाम तोडणी कामगारांवर होणार आहे. सरकारच्या कामगारांच्या उदासीन धोरणामुळे आधीच फरपट सुरू असणाऱ्या कामगारांसमोरील अडचणी वाढणार आहेत. (प्रतिनिधी)