राज्यभरात ‘गाव तेथे जिजाऊ ब्रिगेड’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST2021-07-09T04:14:25+5:302021-07-09T04:14:25+5:30
संगमनेर : जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोना काळात उल्लेखनीय काम केले. रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याने जनतेच्या मनात आदराचे ...

राज्यभरात ‘गाव तेथे जिजाऊ ब्रिगेड’ अभियान
संगमनेर : जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोना काळात उल्लेखनीय काम केले. रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याने जनतेच्या मनात आदराचे स्थान निर्माण झाले आहे. आक्रमक असणाऱ्या जिजाऊ ब्रिगेडकडे महिला मोठ्या संख्येने आकर्षित होत असून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभरात ‘गाव तेथे जिजाऊ ब्रिगेड’ अभियान सुरू करत आहोत, असे जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्षा माधुरी भदाणे यांनी सांगितले.
बुधवारी (दि. ७) संगमनेरात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. सामाजिक कार्यकर्ते संदीप खताळ यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आढावा समितीप्रमुख राज्य उपाध्यक्ष के. डी. पाटील, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे, विभागीय संघटक अभियंता प्रमोद आहेरराव, मराठा सेवा संघ मार्गदर्शक चंद्रकांत नवले, अकोले तालुकाध्यक्ष दिलीप शेणकर, डॉ. माणिकराव शेवाळे, संभाजी ब्रिगेड प्रदेश सचिव डॉ. संदीप कडलग, संघटक सोमनाथ नवले, जिजाऊ ब्रिगेड अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्षा डॉ. दीपाली पानसरे, उपजिल्हाध्यक्षा डॉ. श्रद्धा वाणी, जिल्हा कार्याध्यक्षा वृषाली कडलग, तालुकाध्यक्ष माधुरी शेवाळे, तालुका उपाध्यक्ष सुवर्णा खताळ, कार्याध्यक्ष डॉ. नीलम शिंदे आदी यावेळी उपस्थित होत्या.
कोरोना काळात जिजाऊ ब्रिगेडने उद्योग व्यवसायावर लक्ष केंद्रित केले असून ‘सुवर्णपंख ॲप’च्या माध्यमातून
महिलांना आत्मनिर्भर करण्याचे ध्येय आहे, असेही प्रदेशाध्यक्षा भदाणे म्हणाल्या. अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा मोडून काढण्यासाठी सर्वांनी पुढे यावे. घराघरांत मराठा सेवा संघाची विचारधारा पोहोचवावी, असे आवाहन आढावा समितीप्रमुख राज्य उपाध्यक्ष पाटील यांनी केले.
प्रास्ताविक डॉ. पानसरे यांनी केले. उपक्रम वृत्तांत डॉ. वाणी यांनी सादर केला. ॲड. सीमा सातपुते, सहसचिव डॉ. वृषाली साबळे, अकोले तालुकाध्यक्ष उज्वला देशमुख, जवळे कडलग शाखाप्रमुख श्रद्धा देशमुख, जिजाऊ ब्रिगेड पोखरी हवेली अध्यक्ष सुचिता घुले, तळेगाव दिघे शाखाप्रमुख डॉ. राजश्री दिघे, संभाजी ब्रिगेड संगमनेर तालुकाध्यक्ष मंजाबापू गुंजाळ, अकोले तालुकाध्यक्ष वैभव गोडसे आदी यावेळी उपस्थित होते.