विमा प्रतिनिधींचे विविध मागण्यांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:23 IST2021-03-23T04:23:04+5:302021-03-23T04:23:04+5:30

राशीन : ऑल इंडिया लाईफ इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन ऑफ इंडिया पुणे डिव्हिजनल काउन्सिलच्या वतीने जागतिक ग्राहक दिनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक ...

Statement of various demands of insurance representatives | विमा प्रतिनिधींचे विविध मागण्यांचे निवेदन

विमा प्रतिनिधींचे विविध मागण्यांचे निवेदन

राशीन : ऑल इंडिया लाईफ इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन ऑफ इंडिया पुणे डिव्हिजनल काउन्सिलच्या वतीने जागतिक ग्राहक दिनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक हित व विमा प्रतिनिधींच्या विविध मागण्यांसाठी कर्जत तालुक्यातील विमा प्रतिनिधींनी श्रीगोंदा शाखा कार्यालयात जाऊन शाखाधिकारी विद्याधर देशपांडे यांना निवेदन दिले. विमा प्रतिनिधी ऑल इंडिया लियाफीचे राष्ट्रीय अध्यक्ष नयनकुमार कमल यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी केंद्र सरकार व भारतीय आयुर्विमा महामंडळासोबत लढा देत आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळाला नावारूपास आणण्यात विमा प्रतिनिधी व महामंडळाचे असंख्य विमेदार यांचा मोलाचा वाटा आहे. परंतु, आजमितीस हे दोन्ही घटक भारतीय आयुर्विमा महामंडळ व भारत सरकार यांच्याकडून दुर्लक्षित केले जात आहेत, असे निवनेदनात म्हटले आहे. लियाफीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मोदीलाल बाफना, वेस्टर्न झोनचे अध्यक्ष सुधीर पाध्ये, सचिव प्रमोदकुमार छाजेड, उपाध्यक्ष दिलीप मुंदडा, इसी कमिटी मेंबर सुभाष मुथियान, खजिनदार रणजित डांगे, राशीन येथील विमा प्रतिनिधी नितीन कानगुडे, सुप्रिया पंडित, दीपक अनारसे, नंदू गोडसे, कमलदेव सपाटे, काकासाहेब काकडे, मिलिंद चुभंळकर, आदी उपस्थित होते.

Web Title: Statement of various demands of insurance representatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.