शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

निळवंडेची राजकीय कालवा-कालव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 12:18 IST

निळवंडे कालव्याच्या कामाचे श्रेय घेण्यावरून शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यात राजकीय चढाओढ लागली आहे.

ठळक मुद्देनिळवंडे प्रकल्पास ३०-४० वर्षे लागली.लाभधारक १८२ दुष्काळी गावांचा पाण्याचा प्रश्न.६८ हजार ८७८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे आवाहन.

रियाज सय्यदशिर्डी : निळवंडे कालव्याच्या कामाचे श्रेय घेण्यावरून शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यात राजकीय चढाओढ लागली आहे. मात्र कालव्यात पाणी आले तरच दुष्काळी १८२ गावे सुजलाम सुफलाम होतील, हेही तितकेच खरे. त्यासाठी राजकारण नव्हे हितकारण होणे अपेक्षित आहे.निळवंडे धरण अकोले तालुक्यात आहे. या धरणाचा डावा कालवा अकोलेसह संगमनेर व राहाता तालुक्यातून प्रस्तावित आहे. अकोलेचे आमदार वैभव पिचड यांनी बंदिस्त कालव्याची मागणी लावून धरली आहे. तर खा. लोखंडे व आ. विखे हे या कालव्यांच्या कामात येणाऱ्या अडचणींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका ऐन तोंडावर असताना ‘लोखंडे-विखे’ हे दोन्ही नेते निळवंडे कालव्याची राजकीय कालवा-कालव करू लागले आहेत. २ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी पारंपरिक पध्दतीने भूमी अधिग्रहण झाल्याचे तांत्रिक कारण देत गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने अकोले तालुक्यात बंदिस्त कालवे होऊ शकत नाहीत, असे स्पष्ट केलेले असताना पिचड मात्र आपली भूमिका सोडायला तयार नाहीत. कालव्यांची कामे बंद पाडली म्हणून दुष्काळी गावातील संतप्त शेतकºयांनी पिचड यांच्या पुतळे दहनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यास अकोलेकरांचा विरोध आहे. पण, गेली ३०-४० वर्षे निळवंडे धरण व कालवे यावर आपली पोळी भाजणाºया राजकारण्यांना निवडणुकांच्या ऐन तोंडावरच हे शहाणपण का बरे सूचले असावे? राजकारण्यांचे चल पुढच्या... तर नसावे? या प्रश्नाची उत्तरे दुष्काळग्रस्त शेतकºयांना आता मिळाले आहे. निळवंडे धरणातून शिर्डी व कोपरगावला पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नेण्यास पाटपाणी कृती समितीचा तीव्र विरोध आहे. त्यावर मात्र कुणीही बोलण्यास तयार नाही. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी