समर वर्कशॉपला पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: May 17, 2016 23:57 IST2016-05-17T23:57:36+5:302016-05-17T23:57:37+5:30
श्रीगोंदा : ‘लोकमत बालविकास मंच’च्या वतीने श्रीगोंदा येथील सदस्यांसाठी समर वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसीय शिबिरामध्ये मुलांनी विविध कलांचे प्रशिक्षण घेतले.

समर वर्कशॉपला पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
श्रीगोंदा : ‘लोकमत बालविकास मंच’च्या वतीने श्रीगोंदा येथील सदस्यांसाठी समर वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसीय शिबिरामध्ये मुलांनी विविध कलांचे प्रशिक्षण घेतले.
अहमदनगर येथील कलाशिक्षक, राष्ट्रपती पदक विजेते अमोल बागूल यांनी वर्कशॉपमध्ये मुलांना बासरीवादन, रांगोळीचे विविध प्रकार, आर्ट अॅण्ड क्राफ्टमध्ये टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनविणे आदी कला शिकविल्या. मुलांसाठी विविध मनोरंजक खेळ घेतल्याने शिबिरात चैतन्य संचारले. विविध परदेशी वाद्यांचे सादरीकरण करून बागुल यांनी वाद्यांची माहिती दिली. मुलांमधील स्टेज डेअरींग वाढावे यासाठी भाषण कसे करावे, शब्दांवरील प्रभुत्व, आवाजातील चढ- उतार यावर मार्गदर्शन केले. यावेळी पाणी बचतीची प्रतिज्ञा देण्यात आली. मुलांनीही या वर्कशॉपमध्ये आपली कल्पकता दाखवत रांगोळीचे विविध स्टेनसील तयार केले. ‘लोकमत बालविकास मंच’च्या या उपक्रमास पालक व विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. या उपक्रमास श्रीगोंदा येथील शारदा विद्या निकेतन शाळेचे सहकार्य लाभले.