ज्वारी वाणांनी केली राज्यात उत्पादनाची क्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:25 IST2021-09-05T04:25:11+5:302021-09-05T04:25:11+5:30
ज्वारीचे उत्पादन वाढण्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या रब्बी ज्वारी वाणांचा व पंचसुत्री तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. महात्मा ...

ज्वारी वाणांनी केली राज्यात उत्पादनाची क्रांती
ज्वारीचे उत्पादन वाढण्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या रब्बी ज्वारी वाणांचा व पंचसुत्री तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने रब्बी ज्वारीसाठी जमिनीच्या प्रकारानुसार वाणांचे संशोधन केलेले आहे. त्यामध्ये हलक्या जमिनीसाठी फुले अनुराधा, फुले माऊली, मध्यम जमिनीसाठी फुले सुचित्रा तर भारी जमिनीसाठी फुले वसुधा, बागायतीसाठी फुले रेवती तर ज्वारीच्या इतर उपयोगासाठी म्हणजेच हुरड्यासाठी फुले मधुर, लाह्यांसाठी फुले पंचमी व पापड बनविण्यासाठी फुले रोहिणी या वाणांचे संशोधन केले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले रब्बी ज्वारीचे वाण आणि विद्यापीठाने शिफारस केलेल्या पंचसुत्री तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीत विक्रमी उत्पादनात घेता येईल.
.............
महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे रब्बी ज्वारीचे विविध वाणांचे मुलभूत, पायाभूत बियाण्यांची निर्मिती केली जाते. हे मूलभूत बियाणे पुढे महाबीजला दिले जाते. या मूलभूत बियाण्यांपासून महाबीज पायाभूत, सत्यप्रत आणि प्रमाणीत बियाण्यांची निर्मिती करुन शेतकऱ्यांना देते. विद्यापीठाने जमिनीच्या प्रकारानुसार ज्वारीचे वाण विकसित केलेले आहे. शेतकऱ्यांनी जमिनीच्या प्रकारानुसार वाणांची निवड करावी व पंचसुत्रीचा वापर करुन भरघोस उत्पादन घ्यावे.
- डॉ. पी.जी. पाटील, कुलगुरु